सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी अभिनेत्री सतत काहींना काही शेअर करतच असतात. त्यातही अभिनेत्रींचे नवनवीन फोटो हा सोशल मीडियावर आणि फॅन्समध्ये चर्चेचा विषय असतो. अभिनेत्री त्यांचे वेगवेगळे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून सोशल मीडियावरील तापमान वाढवतात. यात टेलिव्हिजनवरील नायिका देखील मागे नाही. नुकतेच बिग बॉस विनर ठरलेल्या अभिनेत्री रूबीना दिलैकने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडीयावर पोस्ट केले आहे.
रुबिनाने तिच्या काही बोल्ड फोटोज एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या फोटो आणि व्हिडिओमध्ये रुबिनाने काळ्या रंगाचा स्विमसूट घातला आहे. या स्विमसूटमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत असून, तिच्या या लूकवर तिने घातलेले गुलाबी रंगाचे कानातले लक्षवेधून घेत आहे. रुबिनाचा हा लूक सध्या फॅन्स आणि मीडियामध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. (rubina dilaik in swiming suit)
रुबिनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा एक व्हिडिओदेखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती स्विमसूटमध्ये दिसत असून स्विमिंगपूलमध्ये डुबकी मारताना दिसत आहे. पूलच्या किनाऱ्यावर असलेल्या पोलला पकडून ती पूलमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असून, पोलला धरूनच पूलमध्ये डुबकीमारत पाण्यामध्ये खेळत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, “प्रत्येक वेळेस मी माझ्यात असणारी पाण्याची भीती एका हसुमागे लपवत असते.” तर फोटो शेअर करताना तिने लिहिले, “जेवढा खोल समुद्र आहे तेवढीच माझ्या इच्छांची उंची आहे.”
रुबिनाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, तिच्या या पोस्टवर फॅन्ससोबत कलाकारांच्या देखील एका पेक्षा एक कमेंट्स येत आहे. तिच्या या पोस्टवर तिचा नवरा अभिनेता अभिनव शुक्लाने देखील कमेंट करत एक फायरचा ईमोजी पोस्ट केला आहे. तर काही फॅन्सने, ‘क्या बात है लेडी बॉस’, काहींनी १ नंबर छोटी बहू’ असे लिहिले आहे.
नुकताच अभिनव आणि रुबिनाचा विशाल मिश्राने गायलेला ‘तुमसे प्यार है’ हा अल्बम प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
–सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…
–मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल










