Saturday, September 19, 2026
Home बॉलीवूड एका पार्टीत ओळख झाली आणि अनुराग कश्यपची पारो बनली; असा होता बोल्ड चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या माही गिलचा प्रवास…

एका पार्टीत ओळख झाली आणि अनुराग कश्यपची पारो बनली; असा होता बोल्ड चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या माही गिलचा प्रवास…

बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री माही गिल आज तिचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. माही गिलचा जन्म 19 डिसेंबर 1975 रोजी चंदीगडमध्ये झाला. माहीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तिला इंडस्ट्रीत तीची ओळख तीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रांमधूनच मिळाली आहे. ‘देव डी’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीची या चित्रपटात भूमिकाही रंजक आहे. माही तिच्या फिल्मी करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असते. अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया.

अभिनेत्री माही गिलला वाढदिवसाच्या पार्टीत पहिला ब्रेक मिळाला. अनुराग कश्यपने माही गिलला एका पार्टीत पाहिले. या पार्टीत माही परफॉर्म करण्यासाठी गेली होती. यावेळी निर्माता अनुराग कश्यपही उपस्थित होता. अभिनेत्रीला पाहिल्यानंतर त्याने तिला ‘देव डी’साठी कास्ट केले. माहीने ‘देव डी’मध्ये पारोची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. माहीला ‘देव डी’साठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समीक्षक पुरस्कार मिळाला. तिला मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमरचा किताबही मिळाला होता. पदार्पणाच्या चित्रपटातून चांगली सुरुवात केल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. त्याच वेळी, माहीने 2003 मध्ये सुपरहिट पंजाबी चित्रपट ‘हवायें’मधून फिल्मी दुनियेत प्रवेश केला.

हिंदी आणि पंजाबी चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेत्री माही गिलने तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्रीचा पहिला तेलगू चित्रपट ‘तुफान’ होता. या चित्रपटात माहीने मोना डार्लिंगची भूमिका साकारली होती. हा चित्रपट ‘जंजीर’चा रिमेक होता. माहीच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती ‘साहेब बीवी और गँगस्टर’, ‘दुर्गामती’, ‘गुलाल’ यांसारख्या सिनेमांचा भाग होती. ती अनेक वेब सीरिजमध्येही दिसली आहे. अभिनेत्रीने ‘अफरन’ आणि ‘फिक्सर’ सारख्या वेब शोमध्येही काम केले आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माही गिलने वयाच्या 17 व्या वर्षी लग्न केले होते. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार, माही गिल म्हणाली होती की, तिला माहित आहे की तिचे पहिले लग्न अयशस्वी झाले होते, कारण त्यावेळी ती परिपक्व नव्हती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2019 मध्ये माही गिलने खुलासा केला होता की ती अडीच वर्षांच्या मुलीची आई आहे. त्यावेळी तिने पतीबद्दल काहीही सांगितले नव्हते. मात्र, काही वेळाने तिने आपला पती रवी केसर असल्याचे उघड केले. दोघांनी गुपचूप लग्न केल्याचे बोलले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अमोल पालेकर यांनी केली आमिर खानची खरडपट्टी; ‘पीके’ ऑस्करला पाठवण्यासाठी ज्युरींवर होता दबाव

हे देखील वाचा