Thursday, April 10, 2025
Home मराठी सई ताम्हणकरचा स्टायलिश अंदाज अन् हॉट लूक करतोय चाहत्यांना वेडा; कलाकारांच्याही उमटतायेत प्रतिक्रिया

सई ताम्हणकरचा स्टायलिश अंदाज अन् हॉट लूक करतोय चाहत्यांना वेडा; कलाकारांच्याही उमटतायेत प्रतिक्रिया

सिनेसृष्टीत बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. तिने तिच्या बोल्ड ऍंड बिनधास्त अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. सोबत ती तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. आपले बोल्ड अन् ग्लॅमरस फोटोशूट ती बऱ्याचवेळा सोशल मीडियावर शेअर करते. पुन्हा अभिनेत्री तिच्या हॉटनेसमुळे चाहत्यांच्या चर्चेत आली आहे.

सईने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यातील तिच्या आकर्षक अशा अदा सर्वांचं लक्ष वेधत आहेत. या फोटोमध्ये सई बरीच हॉट दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यात तिने फुलांची प्रिंट असलेलं शर्ट आणि पँट घातली आहे. सोबतच तिने ज्या स्टायलिश अंदाजात वरून कोट घातला आहे, तो अंदाज नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. न्यूड मेकअप करून, तिने केसांची पोनी बांधली आहे.

हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “हे ‘मिमी’ साठी.” सईच्या या फोटोची आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चाहते यावर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहे. केवळ चाहतेच नव्हे, तर अनेक कलाकारही तिच्या फोटोवर कमेंट करून, तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तिचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांना भावतो. यापूर्वीही बऱ्याचदा सईने आपल्या अदांनी चाहत्यांना पुरते वेडे करून सोडले आहे. (Sai Tamhnakar shared her hot look in printed outfit see here)

क्रिती सेनन मुख्य भूमिकेत असलेला तिचा ‘मिमी’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ करण्यात आला आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शिवाय ती लवकरच ‘कलरफुल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’

राहुल- दिशाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले त्यांच्या घरी; नवदाम्पत्यासह डान्स करून केली ‘ईतकी’ मोठी मागणी

-शोएब इब्राहिमचे वडील ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात दाखल; दीपिका कक्करने केली सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना

हे देखील वाचा