Saturday, July 6, 2024

दोन बिहिनींच्या मध्ये असणाऱ्या ‘या’ लहान मुलाला ओळखलता का? आज आहे बॉलिवूडचा रॉयल स्टार

सोशल मीडियावर सतत सेलिब्रिटी आपल्या  बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आपले आणि कुटुंबियांचे फोटो शेअर करत असतात. प्रेक्षकांमध्ये आपल्या आवडत्या कलाकाराच्या फोटोंकडे सतत लक्ष असते त्याशिवाय या कलाकारांना ओळखण्यासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धाही होत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत असतात. अशातच एका कुटुंबियाचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लहानपणीचे हे सगळे भाऊबहीन आता बॉलिवूडमधील टॉपचे कलाकार म्हणून ओळखले जातात.

बॉलिवूड कलाकारांचे लेटेस्ट फोटोज तर आपण रोजच पाहात असतो मात्र, त्यांना लहानपणीच्या रुपात ओखणं फारच कठीण असतं. अशातच सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन बहिनी, एक भाऊ  आणि त्यांची आई पाहायला मिळत आहेत. सध्या हे कुटुंब बॉलिवूडमध्ये रॉयल कुटुंब म्हणून ओळखलं जातं. त्याशिवाय या अभिनेत्याची बायको आणि मुलगी देखिल इंडस्ट्रीमध्ये आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात्यात. जर अजूनही तुम्हाला समजले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतोकी या फोटोंमध्ये दिणारा अभिनेता दुसरा तिसरा नसून पटौदी कुटुंबीय सैफ अली खान (Saif Aki Khan) आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सैफ त्याची बहीन सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि सबा अली खान (Saba Ali Khan) सोबत दिसत आहे. सैफ आता बॉलिवूडमधील एक सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय त्याची पत्नी करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) या देखिल टॉपच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सैफची आई शर्मिला टागोर (Sharmila Tagor) या देखिल त्यांच्या काळातील सुपरस्टार होत्या. सैफची बहीन सोहा देखिल अनेक गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

सौफ अली खानचा जन्म (दि, 16 ऑगस्ट 1970) साली झाला तेव्हा त्याची आई शर्मिला बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री होत्या तर वडील पूर्व भारतीय कॅप्टन आणि दिग्गज खिलाडी मंसूर अली खान पटौदी होते. सबा नेहमी सोशल मीडियावर पूर्ण कुटुंबियांचे जुने फोटो शेअर करत असेत. जर तुम्हाला पटौदी कुटुंबियांचे पूर्ण फोटो पाहायचे असतील तर सबाच्या अकाउंटवर पाहायला मिळतील.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
बिग बॉसची ही स्पर्धक दुसर्यांदा अडकणार लग्न बंधनात; मोठ्या बिझनेसमन बरोबर थाटणार संसार
VIDEO| तब्बल 50 वर्षानंतर मुमताज आणि धर्मेंद्र देओल पुन्हा एकत्र, पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा