‘खरेपणा हा नेहमी डोळ्यांत दिसतो’ म्हणत आर्चीने शेअर केले दोन खास फोटो

Sairat fame actress rinku rajguru shares her beautiful photo and video looking elegant


नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाद्वारे रिंकू राजगुरूने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीचे यश मिळवले. या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या चित्रपटात तिने ‘आर्ची’ची भूमिका साकारली होती. त्यामुळे प्रेक्षक आजही तिला ‘आर्ची’च्या नावाने संबोधतात. रिंकू या दिवसांत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत राहते.

नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे. तिने अबोली रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच अगदी हलका मेकअप करून तिने केस मोकळे सोडले आहेत. यासह ती तिच्या निराळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे.

फोटो शेअर करत तिने लिहले, “खरेपणा नेहमी डोळ्यात असतो” (the truth is always in eyes). तिच्या या फोटोवर चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळते. अवघ्या काही तासांतच फोटोला 38 हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. बऱ्याच चाहत्यांनी फोटोवर कमेंट करून त्यांचे प्रेमही व्यक्त केले आहे.

याशिवाय याच लूकमध्ये तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रिंकूचा अतिशय मनमोहक असा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. यात ती मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे. तिच्या या हसण्यावर चाहतेही फिदा झाल्याचे पाहायला मिळते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहले, “हसणे ही आपण करू शकणारी सर्वात सुंदर गोष्ट आहे” (smile is the prettiest thing you can wear). या व्हिडिओलाही चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

नुकतीच रिंकू लारा दत्तासोबत ‘हंड्रेड’ या वेब सिरीजमध्ये दिसली होती. रुचि नारायण दिग्दर्शित या सिरीजमध्ये तिने एका मराठी मुलीची भूमिका केली होती. यातील रिंकूच्या कामाचे खूप कौतुक झाले. तसेच सिरीजमधील रिंकूचा लूक प्रेक्षकांना खूप आवडला.

आता ती आगामी चित्रपट ‘झुंड’ मध्ये आकाश ठोसर सोबत दिसणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. तसेच, चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत असून, हा चित्रपट यावर्षी 18 जून रोजी प्रदर्शित करण्यात येईल.


Leave A Reply

Your email address will not be published.