[rank_math_breadcrumb]

डेब्यू सिनेमात अहान पांडे आणि अनित पद्ढा यांना किती फी मिळाली? जाणून घ्या सविस्तर

अहान पांडे (Ahan Pandey) आणि अनित पद्ढा यांचा ‘सैय्यारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर येताच अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकहा सिनेमा एकदा नाही तर अनेक वेळा पाहणार आहेत. बऱ्याच काळानंतर अशी प्रेमकहाणी पाहायला मिळाली आहे. अहान आणि अनित त्यांच्या पहिल्या चित्रपटापासून सर्वत्र आहेत. तुम्हाला माहिती आहे का अहान आणि अनित यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी किती फी मिळाली आहे?

हाती आलेल्या माहितीनुसार जेव्हा मोठ्या आणि प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत नवीन चेहरे लाँच केले जातात तेव्हा त्यांना ३-५ कोटी फी मिळते. अहानची फी या आकड्यापेक्षा जास्त असू शकते कारण तो चंकी पांडेचा पुतण्या आहे. अहानला अनितपेक्षा जास्त फी मिळाली असण्याची शक्यता आहे. परंतु याबद्दल काहीही अधिकृत केलेले नाही.

सैयारा हा चित्रपट ६० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रमोशनसाठी मिळालेले पैसे देखील समाविष्ट आहेत. मोहित सुरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि त्याला चांगली रक्कम देखील मिळाली आहे. वृत्तानुसार, तो एका चित्रपटासाठी ६-८ कोटी रुपये घेतो पण ते चित्रपटाच्या यशावर देखील अवलंबून असते.

सैयारा च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. चित्रपटाने तीन दिवसांत ८३ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने २१ कोटी, दुसऱ्या दिवशी १९.०५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास जास्त वेळ लागणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

पन्नाशी पूर्ण होऊनही मलायका अरोरा एवढी तरुण कशी दिसते? फॉलो करा हे स्किन केअर रुटीन
बिग बॉसमध्ये ३१ वर्षांनी लहान असलेल्या जसलीनशी नाव जोडल्याबद्दल अनुप जलोटाचे स्पष्टीकरण