×

‘ही कसली फॅशन आहे?’, साक्षी चोप्राचे व्हायरल फोटो पाहून चक्रावले नेटकरी

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक मॉडेल आणि अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्या बोल्ड फोटोंची, ड्रेसची नेहमीच जोरदार चर्चा पाहायला मिळत असते. यामध्ये साक्षी चोप्राचे (Sakshi Chopra) देखील नाव प्रामुख्याने घेतले जाते. सध्या साक्षी चोप्राच्या एका व्हायरल फोटोची सध्या चर्चा सुरू आहे.

रामानंद सागर (Ramanand Sagar) हे मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांनी रामायण सारख्या पौराणिक मालिकांची निर्मिती केली होती ज्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांची नात साक्षी चोप्रासुध्दा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिचे असेच बोल्ड व्हायरल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

प्रसिद्ध फोटोग्राफरने हे फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. जे बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल होत असते. या फोटो मध्ये साक्षीची विचित्र कपडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोवर तिचे चाहतेसुद्धा जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. तिचे हे फोटो पाहून अनेकांनी ही कसली फॅशन आहे? असे म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. आपल्या ड्रेसमुळे ट्रोल होण्याची ही साक्षीची पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा साक्षी तिच्या ड्रेसवरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. साक्षी नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे फोटो शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

हेही वाचा –

Latest Post