Saturday, April 20, 2024

कहर! ‘त्या’ व्यक्तीबरोबर लग्न केलं असतं तर आज सलमान झाला असता आजोबा?

सलमान लग्न कधी करणार? हा प्रश्न जणू जागतिक मुद्दाच झाला आहे. त्याला नेहमीच हा प्रश्न विचारला जातो. सलमान खान बॉलिवूडचा मोस्ट ऍलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडचा हा दबंग भाईजान त्याच्या चित्रपटांइतकाच त्याच्या खाजगी आयुष्यातील वाद आणि मुख्य म्हणजे त्याच्या अनेक प्रेमप्रकरणांमुळे खूप प्रसिद्ध आहे. सलमान खान म्हणजे सुपरहिट चित्रपट हे समीकरण मागील काही काळापासून सतत यशस्वी होत आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोविंगसाठी सलमान ओळखला जातो. त्याच्या आयुष्यात अनेक मुली येऊन गेल्या असल्या, तरीही ५५ व्या वर्षी सलमान अविवाहित आहे.सलमानच्या बिग बॉस का कार्यक्रमात अजय देवगण आणि काजोल पोहचले असतांना त्यावेळी, बोलण्याबोलण्यात सलमानने त्याच्या शालेय जीवनातील एक किस्सा सर्वांसोबत शेयर केला.

या कार्यक्रमात एका गेम दरम्यान सलमानने त्याच्या शाळेतल्या एका त्याला आवडणाऱ्या मुलीबद्दल सर्वाना सांगितले. सलमान म्हणाला, ” मी शाळेत असतांना मला माझ्या वर्गातील एक मुलगी खूप आवडायची. आज माझे लग्न तिच्यासोबत झाले असते तर मी आतापर्यंत आजोबा झालो असतो.”

पुढे बोलताना सलमान म्हणाला, ” मला ती मुलगी खूप आवडायची. शाळेत असतांना त्या मुलीच्या नादात मला तिच्याच कुत्र्याने चावले देखील होते. तरीही ती मला खूप आवडायची पण माझी कधीच तिला हे सांगण्याची हिम्मत झाली नाही. नंतर मला समजले की तिचे माझ्या तीन मित्रांसोबत अफेयर सुरु होते आणि तिला देखील मी आवडत होतो. काही वर्षांपूर्वी ती मुलगी मला भेटली होती, तेव्हा मला समजले की ती आता आजी झाली आहे. त्यावेळी माझ्या मनात विचार आला बरे झाले मी हिला काही सांगितले नाही, नाहीतर आज मी आजोबा झालो असतो.”

सलमान अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत लग्न करणार होता, अगदी लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या गेल्या होत्या, मात्र ऐनवेळेस हे लग्न तुटले. सलमानच्या जीवनात ऐश्वर्यापासून ते कटरिना कैफ, लुलिया विंतुर पर्यंत अनेक मुली आल्या तरीही आज सलमान अविवाहित आहे. सलमान आणि त्याच्या अफेयरच्या चर्चा नेहमीच बॉलिवूडमध्ये रंगत असतात.

सलमाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘राधे’ या सिनेमात दिसणार आहे. पेयाबहुदेव दिग्दर्शित या सिनेमात सलमानसोबत दिशा पाटणी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा मुख्य भूमिका निभावताना दिसणार आहे.

हे देखील वाचा