पहिल्याच चित्रपटात असे काय झाले की, सलमानने घेतला होता रवीनासोबत कधीच काम न करण्याचा निर्णय?

0
182
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/Shemaroo Filmi Gaane

रवीना टंडन ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नव्वदच्या दशकातील तिच्या दर्जेदार चित्रपटांची आजही चर्चा होत असते. रवीनाने ‘पत्थर के फूल’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता सलमान खान दिसला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना रवीनाने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेला सलमान खानसोबतचा असाच एक किस्सा सांगितला आहे. ज्यामुळे सलमानने पुन्हा तिच्यासोबत चित्रपट करायला स्पष्ट नकार दिला होता.

सन 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पत्थर के फूल’ चित्रपटातून अभिनेत्री रवीना टंडनने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत बलाणी होते, तर चित्रपटाची कथा सलीम खान यांनी लिहिली होती. रवीनासोबत चित्रपटात अभिनेता सलमानने काम केले होते. चित्रपटातील रवीना आणि सलमानच्या जोडीचे खूप कौतुक झाले होते. त्यासोबतच चित्रपटातील गाणीसुद्धा सुपरहिट ठरली होती. एकंदरीत हा चित्रपट चांगलाच यशस्वी झाला होता, परंतु रवीना आणि सलमानमध्ये चित्रपटाच्या सेटवर जोरदार वाद झाला होता. ज्यामुळे सलमान खानने पुन्हा रवीनासोबत काम करण्यास नकार दिला होता. या सगळ्या प्रकरणाचा खुलासा खुद्द अभिनेत्री रवीना टंडनने केला आहे.

सलमान खानसोबत पदार्पण चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल एका चॅनेलशी बोलताना रवीनाने सांगितले की, “आम्ही दोघेही एकाच वर्गातील त्या मुलांप्रमाणे होतो, जे प्रत्येक गोष्टीसाठी आपापसात भांडत असतात. मी त्यावेळी साडे सोळा वर्षाची होते, तर सलमान खान 23 वर्षाचा होता. आम्ही दोघेही मस्तीखोर होतो. आमच्या दोघांचा स्वभाव देखील सारखाच आहे. महत्त्वाचे म्हणजे आम्ही जवळजवळ एकाच घरात वाढलो आहे. कारण सलीम अंकल माझ्या वडिलांचे मित्र होते. म्हणजे हे असं झालं की, आम्ही घरातूनच भांडणाला सुरुवात केली होती आणि या सगळ्या चित्रपटात आम्ही भांडत राहिलो. ज्यामुळे सलमान खानने ‘पुन्हा हिच्याबरोबर काम करणार नाही,’ असे जाहीर केले होते. त्यानंतर आम्ही ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटात काम केले.”

दरम्यान रवीना टंडनने हिंदी चित्रपट जगतात नव्वदच्या दशकात अनेक दर्जेदार चित्रपटांत काम केले होते. ज्यामध्ये ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘अंदाज अपना अपना’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘टिप टिप बरसा’ गाण्यात अक्षय कुमारसह काम करायला तयार नव्हती रवीना, दिग्दर्शकानेच लढवली ‘ही’ युक्ती
का राहिली अक्षय कुमार आणि रवीना यांची प्रेम कहाणी अपूर्ण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here