Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सलमानचा ‘गजनी’ लूक सोशल मीडियावर व्हायरल; चाहते म्हणाले- ‘तेरे नाम 2ची तयारी…’

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि ‘दबंग’ म्हणजेच सलमान खान होय. केवळ भारतातच नाही तर देशभरात त्यांचे चाहते आहेत. सलमान खानचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. सलमान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमानची स्टाईल सोशल मीडियावर चाहत्यांच लक्ष वेधत असते. तो त्याच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत येत असतो. सध्या या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.रविवारी ( 20 ऑगस्ट) मुंबईतील एका पार्टीत बॉलिवूडचा भाईजान त्याच्या नव्या लुकमध्ये दिसला. त्याला पाहून सलमान खानतेरे नाम 2‘ ची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान (Salman Khan)  नव्या लूकमध्ये दिसत आहे. सलमान खान त्याच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. भाईजान एका पार्टीत सहभागी होण्यासाठी मुंबईत आला होता. यादरम्यान, अभिनेता नवीन लूकमध्ये दिसला. या पार्टीसाठी सलमान हाफ स्लीव शर्ट आणि पँटमध्ये दिसून येत आहे. तर त्याचे केस खूप लहान कापलेले पहायला मिळाले. ‘तेरे नाम’ या चित्रपटातील राधेप्रमाणे त्याची ही हेअरस्टाइल असल्यामुळे चर्चेला उधान आले आहे. ‘

सलमानच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले की, ‘केस कापल्यानंतरही तो मीडियासमोर कॅप लावून येत नाहीये. यासाठी त्याचं खूप कौतुक केलं पाहिजे’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘भाईजान तेरे नाम 2’ तर आणखी एकाने लिहिले की. ‘जुना सलमान परतला आहे’, अशा वेगवेगळ्या कमेंट चाहते करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

 सलमान खान विषयी बोलायचंं झाल तर, तो ‘टायगर 3’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले. आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर टायगर आणि झोयाच्या जोडीची जादू पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (Salman Khan’s ‘Ghajni’ look viral on social media)

अधिक वाचा- 
‘रोज मासे खा… ऐश्वर्या रायसारखे सुंदर व्हा’, भाजप सरकारच्या ‘या’ मंत्र्याचा तरुणांना अजब सल्ला
‘पद्म’ पुरस्कारासाठी सुधीर मुनगंटीवार करणार अशोक सराफांच्या नावाची शिफारस; अभिनेते म्हणाले…

हे देखील वाचा