आजकाल बॉलिवूड चित्रपटांपेक्षा साऊथ चित्रपटांचा जास्त क्रेझ आहे. ‘पुष्पा’, ‘केजीएफ 2’ आणि ‘आरआरआर’ यांसारख्या चित्रपटांनी थिएटरमध्ये दबदबा निर्माण केला आहे. यानंतर नुकताच ‘लायगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तो बॉलिवूड स्टाईलमध्ये बनवण्यात आला असल्याचे लोकांनी सांगितले आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu)हिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘यशोदा’ मधून तिचा नवा लूक रिलीज करण्यात आला आहे, हे पाहून तुम्हाला ‘द फॅमिली मॅन 2’ चा लूक आठवेल.
‘यशोदा’ चित्रपटातून प्रदर्शित झालेल्या समंथाच्या नव्या लूकमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर अनेक जखमा असून ती लोकांच्या गर्दीत दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये आणखी एक गोष्ट पाहण्यासारखी आहे ती म्हणजे त्यांच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त महिलाच दिसत आहेत. यात समंथाची अतिशय डॅशिंग स्टाईल पाहायला मिळणार आहे, जी चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करत आहे. पोस्टरवरुन एक गोष्ट होते की, अभिनेत्री यात अॅक्शन सीन करणार आहे आणि पोस्टरमध्ये दाखवलेला तिचा लूक चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्सचा आहे. यामध्ये ती खूप रागातही दिसत आहे.
View this post on Instagram
पोस्टर शेअर करण्यासोबतच ‘यशोदा’ चित्रपटाच्या टीझर व्हिडिओची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. त्याचा टीझर व्हिडिओ ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे दिग्दर्शन हरी-हरीश करत आहेत. चित्रपटात हाय अॅक्शन सीन पाहायला मिळणार आहे. त्याचे निर्माते शिवलेका कृष्णा प्रसाद आहेत. असे म्हटले जात आहे की निर्माते चित्रपटाच्या भव्य प्रदर्शनाची योजना आखत आहेत आणि श्रीदेवी मुव्हीजच्या बॅनरखाली हा 5 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल. समंथासोबतच वरलक्ष्मी सरथ कुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पिका गणेश, दिव्या श्रीपादा, प्रियांका शर्मा आणि इतर कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
याशिवाय समंथाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ‘शाकुंतलम’ हा तिच्या आगामी चित्रपटांपैकी एक आहे. त्याचे चाहतेही याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी, अभिनेत्री तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे देखील खूप चर्चेत आहे.ही अभिनेत्री शेवटची अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने ‘ऊ अंतवा’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. हे या चित्रपटाचे आयटम साँग होते आणि अभिनेत्रीने तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची मोहिनी पसरवून खूप प्रसिद्धी मिळवली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉपची जबाबदारी घेणार, आमिर खानने नाकारले मानधनाचे इतके कोटी
‘टायटॅनिक’ फेम अभिनेत्याचं 4 वर्षांचं रिलेशनशिप पाण्यात बुडालं, गर्लफ्रेंडशी बिनसल्यानं घेतला निर्णय
कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान! पाहा फोटो