Thursday, July 18, 2024

‘टायटॅनिक’ फेम अभिनेत्याचं 4 वर्षांचं रिलेशनशिप पाण्यात बुडालं, गर्लफ्रेंडशी बिनसल्यानं घेतला निर्णय

कलाविश्वात दररोज नाती बनतात आणि तुटतात. आता तुटणाऱ्या नात्यांमध्ये हॉलिवूड सुपरस्टारचा समावेश झाला आहे. ‘टायटॅनिक’ फेम अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिको याचे अमेरिकन मॉडेल कॅमिला मोरोन यांच्या नात्याचा चुराडा झाला आहे, म्हणजेच त्यांचा ब्रेकअप झाला आहे. 47 वर्षीय लिओनार्डो कथितरीत्या मागील 4 वर्षांपासून 25 वर्षांच्या कॅमिलाला डेट करत होता.

लिओनार्डो डिकॅप्रियो (Leonardo DiCaprio) आणि कॅमिला मोरोन (Camila Morrone) हे पहिल्यांदा 2017मध्ये कपल म्हणून एकत्र स्पॉट झाले होते. लिओनार्डो आणि कॅमिला हे नुकतेच 4 जुलै रोजी एकत्र दिसले होते. जूनमध्येच कॅमिला 25 वर्षांची झाली होती. लिओनार्डो आणि कॅमिला यांनी त्यांचे रिलेशनशिप वैयक्तिक ठेवले होते. मात्र, फेब्रुवारी 2020मध्ये ऑस्कर पुरस्कारांदरम्यान एकत्र पोहोचलेल्या या दोघांनीही त्यांचे नाते अधिकृत केले होते. तब्बल 15 वर्षांनंतर असे घडले होते, ज्यामध्ये लिओनार्डो ऑस्कर पुरस्कारात त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पोहोचला होता.

वेगळे होण्यामागील कारण अद्याप समजले नाही
यानंतर लिओनार्डो आणि कॅमिला हे दोघेही सप्टेंबर 2021मध्ये यूएस ओपनदरम्यान एकत्र पाहायला मिळाले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, सूत्रांनी लिओनार्डो आणि कॅमिला यांच्या वेगळे होण्याची पुष्टी केली आहे. मात्र, रिपोर्ट्समध्ये दोघांच्या वेगळे होण्यामागील कारण सांगितले गेले नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Leonardo DiCaprio (@leonardodicaprio)

परस्पर संमतीने मोडले नाते
माध्यमांतील वृत्तानुसार, लिओनार्डो आणि कॅमिला यांनी जून महिन्यानंतर त्यांचे नाते तोडले आहे. लिओनार्डो आणि कॅमिला यांनी उन्हाळ्याच्या मोसमात त्यांचे नाते संपवले. त्यांच्यात कोणतीही वाईट भावना नाहीये. दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

लिओनार्डो याच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा 2021मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डोन्ट लूक अप’ या सिनेमात झळकला होता. विशेष म्हणजे, लिओनार्डो याला ‘ऑस्कर’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. त्याच्या सर्वोत्तम सिनेमांमध्ये ‘टायटॅनिक’, ‘द एविएटर’, ‘द वुल्फ ऑफ ऑल स्ट्रीट’ आणि ‘द रेव्हनंट’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खानसोबत ‘ही’ अभिनेत्री होस्ट करणार बिग बॉस 16? नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकित
जे नव्हतं सांगायचं, तेच सांगून बसली शहनाज गिल; म्हणाली, ‘या’ व्यक्तीला सतत करते सोशल मीडियावर स्टॉक
दारा सिंग यांच्यासोबत दिसणाऱ्या चिमुकल्याला ओळखलं का? बनलाय सुपरस्टार, एका सिनेमातून छापतो 100 कोटी

हे देखील वाचा