दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (samntha ruth prabhu) सर्वत्र प्रसिद्ध आहे. ‘पुष्पा‘मधील (pushpa) आयटम सॉंगनंतर समंथा सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. समंथा प्रत्येकवेळी तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावते. समंथाने नुकतेच एका मासिकासाठी फोटोशूट केले असून त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यात समंथा तिच्या करिअरबद्दल बोलली आहे. तिच्या करिअरबद्दल सांगताना समंथा म्हणाली की, एक काळ असा होता जेव्हा तिला तिच्या त्वचेबद्दल अस्वस्थ वाटत असे.
मे-जून २०२२ मध्ये साउथ इंडस्ट्रीची टॉप अभिनेत्री समंथा एका प्रसिद्ध मासिकाची कव्हर गर्ल बनली आहे. मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी समंथाने बोल्ड पोज दिल्या आहेत. तिच्या कव्हर शूटचा एक फोटो शेअर करताना, समांथाने लिहिले, “मला विश्वास आहे की अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आहे, मी आता म्हणू शकते की मला आत्मविश्वास आहे, आणि हे वय आणि परिपक्वतेसह येते.”
समंथा पुढे म्हणाली- माझ्या त्वचेला आराम मिळण्यासाठी मला थोडा वेळ लागला. मी वेगवेगळ्या भूमिका आत्मविश्वासाने साकारतो, मग ते एखादे सेक्सी गाणे असो किंवा हार्डकोर अॅक्शन, जे मी यापूर्वी कधीच करण्याचे धाडस केले नाही.”
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, समंथाकडे अनेक भरपूर प्रोजेक्ट आहेत. ज्यामध्ये ‘शकुंतलम’ आणि ‘यशोदा’ सारखे चित्रपट आहेत. समंथाचा ‘यशोदा’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती सध्या विजय देवरकोंडासोबत तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हा चित्रपट एक प्रेमकथा असणार आहे. याशिवाय सामंथा वरुण धवनसोबत एका प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे. समांथाच्या बॉलिवूड डेब्यूची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- मातृदिनाच्या निमित्ताने सोनाली खरेच निर्मिती क्षेत्रात पदार्पण, आगामी ‘मायलेक’ चित्रपटाचा पोस्टर रिलीझ
- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाबाबत केले वक्त्यव्य; म्हणाले, ‘आनंद दिघेंसारखा नेता पुन्हा होणे नाही’
- शेजारच्या मुलाच्या शिक्षणासाठी एका व्यक्तीने मागितली मदत, सोनू सूद म्हणाला, ‘अभ्यासाची वेळ आली आहे’