×

जीव तोडून ओरडणारा फोटो शेअर करत, कोणत्या वेदनांबद्दल बोलतोय संजू बाबा?

बॉलिवूड जगतात जेव्हा संजय दत्तबद्दल (Sanjay Dutt) बोलले जाते, तेव्हा त्याच्या नावासोबत बाबा, हँडसम हंक आणि कूल ड्युड ही नावे जोडलेली असतात. संजय दत्त अनेकदा त्याच्या फिटनेस फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांना वर्कआउट करण्यासाठी प्रेरित करताना दिसतो. नुकताच संजू बाबाने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये संजय दत्त ओरडताना आणि जिममध्ये जबरदस्त वर्कआउट करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना संजय दत्तने वेदनांवर दोन ओळीही लिहिल्या आहेत.

हा फोटो शेअर करत संजय दत्तने चाहत्यांसाठी एक प्रेरणादायी कॅप्शन लिहिले आहे. संजयने या पोस्टसोबत लिहिले आहे की, “एकतर तुम्ही शिस्तीचे दुःख सहन करा किंवा आयुष्यभर पश्चातापाचे दुःख सहन कराल, निवड तुमची आहे…” हे कॅप्शन वाचून नेटकरी तिचे कौतुक करताना दिसत आहेत. (sanjay dutt gives major workout goals)

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

काही वेळातच या फोटोवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. संजय दत्तने त्याच्या फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरदिवशी संजय दत्त त्याच्या चाहत्यांसाठी त्याचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. या अगोदर आपला फोटो शेअर करताना संजय दत्तने लिहिले होते की, “वय हा फक्त एक आकडा आहेे.” त्या फोटोमध्येही संजय दत्त हेवी वर्कआउट करताना दिसत होता.

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संजय दत्त आपल्या मस्क्युलर बॉडीने चाहत्यांना नेहमी प्रेरणा देत असतो. वयाच्या ६२ व्या वर्षी देखील संजय दत्तची ही स्टाइल प्रेक्षकांना घायाळ करत आहे. सध्या संजय दत्त त्याच्या ‘केजीएफ २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

हेही वाचा

‘या’ कारणामुळे फिके पडतायत बॉलिवूड चित्रपट, संजय दत्तने केला खुलासा

‘या’मुळे संजय दत्तला मागावी लागली होती माधुरी दीक्षितची माफी, ‘अशी’ होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

मुलींना इम्प्रेस करण्यासाठी जेव्हा संजय दत्त घ्यायचा ड्रग्स, लोकांनी पाडले होते ‘चरसी’ नाव

Latest Post