Monday, February 2, 2026
Home बॉलीवूड संजीव कुमारांच्या एका अटीमुळे तुटले होते हेमा मालिनींशी त्यांचे नाते, अभिनेत्री ब्रेकअपवर बोलल्या ‘असे’ काही

संजीव कुमारांच्या एका अटीमुळे तुटले होते हेमा मालिनींशी त्यांचे नाते, अभिनेत्री ब्रेकअपवर बोलल्या ‘असे’ काही

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते होऊन गेले, ज्यांच्या चित्रपटांची आजही चर्चा होत असते. या यादीत अभिनेते संजीव कुमार (Sanjiv Kumar) यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. हिंदी चित्रपट जगतातील यशस्वी अभिनेते म्हणून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अवघ्या पन्नासाव्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या संजीव कुमार यांनी छोट्याशा कारकिर्दित मोठी मजल मारली होती. ज्यामुळे त्यांच्या नावाची आजही चर्चा होत असते. संजीव कुमार यांच्या चित्रपटांइतकीच त्यांच्या प्रेमप्रकरणांचीही त्याकाळात जोरदार चर्चा रंगली होती. यामध्ये त्यांचा आणि अभिनेत्री हेमा मालिनींचा (Hema Malini) एक किस्सा चांगलाच गाजला होता. काय होता तो किस्सा चला जाणून घेऊ.

हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेते असलेले संजीव कुमार आणि ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्या प्रेम प्रकरणाची त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की, त्यांच्या लग्नाच्याही बातम्या त्यावेळी समोर आल्या होत्या. मात्र या बातम्या फक्त चर्चाच बनून राहिल्या आणि त्यांच्या या प्रेमप्रकरणाचा लग्नाने गोड शेवट होऊ शकला नाही.

संजीव कुमार यांनी आपल्या आत्मचरित्रातही याबद्दलचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी गैरसमजांमुळे हे नाते तुटल्याचे सांगितले होते. अभिनेते संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्यात ‘सीता और गीता’ चित्रपटाच्या वेळी जवळीक वाढली होती. या चित्रपटाचे एक गाणे शूट करताना दोघेही जखमी झाले होते. त्यामुळेच त्यांच्या नात्यातील प्रेम बहरात आले होते. मात्र संजीव कुमार यांनी लग्नानंतर हेमा मालिनींनी चित्रपटात काम करू नये अशी त्यांच्यापुढे अट ठेवली होती. ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.

त्यांच्या या प्रेमप्रकरणाबद्दल अभिनेत्री हेमा मालिनींही एका मुलाखतीत खुलासा केला होता. ज्यामध्ये त्यांनी “संजीव कुमार यांना त्यांचे घर सांभाळणारी, त्यांच्या आईला सांभाळणारी, स्वतः च्या करिअरपेक्षा घराकडे लक्ष देणारी मुलगी हवी होती. आणि इतका त्याग मी करु शकत नव्हते. त्यामुळे आम्ही लग्न करु शकलो नाही,” असा खुलासा केला होता. दरम्यान अभिनेते संजीव कुमार यांनी ‘आंधी’, ‘अंगुर’ अशा गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा