अरे व्वा! लग्नासाठी मुलगा शोधतेय अभिनेत्री सान्या मल्होत्रा; म्हणाली, ‘…तर मला फोन करा’

sanya malhotra ready to marry anyone says if you re the one call me


अभिनेत्री सान्या मल्होत्राने खूप कमी वेळात, आपली खास ओळख निर्माण केली आहे. सान्या मल्होत्राचा अखेरचा चित्रपट ‘पगलेट’ नेटफ्लिक्सवर रिलीझ झाला होता, ज्यामध्ये प्रेक्षकांनी तिचे पात्र खूपच पसंत केले. पण सध्या सान्या तिच्या कोणत्या चित्रपटामुळे नव्हे, तर तिच्या लग्नासाठी चर्चेत आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या लग्नाबद्दल खुलेपणाने बोलली आहे आणि तिला कसा मुलगा हवा आहे हेही सांगितले आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत, सान्या मल्होत्रा तिच्या लग्नाबद्दल आणि बर्‍याच इतर गोष्टींबद्दल बोलताना दिसली. तिने सांगितले की, ती अविवाहित आहे आणि लग्नासाठी देखील तयार आहे. सान्या म्हणाली, “हा एक अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे, मला प्रामाणिकपणे माहित नाही. मी अविवाहित आहे आणि लग्न करण्यास तयार आहे. मी माझ्या मित्रांना याबद्दल नेहमी विचारते आणि ते मला म्हणतात की, तू स्वतःला यातून बाहेर काढ आणि हे मला अजिबात समजत नाही.” मात्र, सान्याने ही गोष्ट मजेत बोलली आहे.

सान्या लग्नासाठी जोडीदारामध्ये काय पाहते? या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली, “तो एक चांगली व्यक्ती असायला हवा, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या जागृत असायला पाहिजे आणि जर आमची मानसिकता एक असेल, तर मी त्याबद्दल खूप कौतुक करेन. जे लोक हे वाचत आहेत, जर तुमच्यापैकी कोणी असे असेल, तर मला एक फोन करा.”

सान्या मल्होत्रा ​​अभिनित चित्रपट ‘पगलेट’ २६ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर रिलीझ झाला होता. हा चित्रपट एका मध्यमवर्गीय कुटुंबातील भावनिक कथा आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्राने विधवा महिलेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सान्याशिवाय सयानी गुप्ता, श्रुती शर्मा, आशुतोष राणा, रघुबीर यादव, शीबा चड्डा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले.

सान्या मल्होत्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीने २०१६ साली ‘दंगल’ चित्रपटाद्वारे कारकिर्दीची सुरुवात केली होती. चित्रपटात तिने कुस्तीपटू बबिता फोगटची भूमिका साकारली होती. यानंतर सान्याने ‘बधाई हो’, ‘फोटोग्राफ’, ‘शकुंतला देवी’ आणि ‘लुडो’ या चित्रपटांमधील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. सान्या मल्होत्रा सध्या तिच्या बऱ्याच प्रोजेक्टवर काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पैशांसाठी केले तिने ‘कांटा लगा’ या वादग्रस्त गाण्यामध्ये काम; एकाच रात्रीत बनली स्टार

-‘करीना कपूरकडे अशी कोणती गोष्ट आहे, जी तुझ्याकडे नाही?’ राणीचे उत्तर ऐकून बसेल धक्का

-एकेकाळी सुंदर चेहरा नाही म्हणून नाकारली गेली होती इरफान खानची अभिनेत्री, आता बॉलिवूडमध्येे वाजवतेय डंका, वाढदिवशी लिहिली भावुक पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.