×

‘बॉलिवूडमध्ये जाऊन मी वेळ वाया घालवू शकत नाही’ हिंदी चित्रपटांवर महेश बाबूचे मोठे वक्तव्य

सध्या संपूर्ण देशातील बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला आहे. यावर्षी तर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये साऊथचेच सिनेमे पुढे आहेत. एवढेच नाही तर ऑल टाईम सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये साऊथच्या चित्रपटांनी बॉलिवूडच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. असे असूनही अनेक दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये देखील त्यांचे नशीब अजमावताना दिसत आहे. मात्र यात असेही काही कलाकार आहेत जे स्पष्टपणे बॉलिवूडमध्ये काम करण्यास नकार देतात. साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेश बाबूने देखील एका कार्यक्रमामध्ये बॉलिवूडमध्ये काम करण्यास नकार देत दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन हे शाहिद झाले. त्यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच सिनेमाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी महेश बाबूने अनेक प्रश्नावर मनमोकळा संवाद साधला. त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्यावर प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, “मला वाटते की, बॉलिवूडला मी परवडू शकत नाही. त्यासाठी मी बॉलिवूडमध्ये जाऊन माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. मला खूपच आनंद आहे की तेलगू चित्रपट संपूर्ण देशात खूपच चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा अर्थ बदलला आहे.”

View this post on Instagram

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

पुढे महेश बाबू म्हणाला, “मला स्वतःला पॅन इंडिया स्टार म्हणून सादर अजिबात करायचे नाही, तर साऊथ चित्रपटांना संपूर्ण देशात यशस्वी करायचे आहे. मी आधीपासूनच तेलगू सिनेमे करू इच्चीत होतो आणि मला वाटायचे की, हे सिनेमे संपूर्ण भारतात पाहिले जावे. आता असे होत असल्यामुळे नक्कीच मी खूप खुश आहे. मला नेहमीच वाटते की, माझी ताकद तेलगू सिनेमेच आहे. याच चित्रपटांनी सर्व सीमा पार करून बॉलिवूड आणि टॉलिवूडला भारतीय सिनेमा बनवले आहे.”

पुढे महेश बाबू बोलला, “मला हिंदी चित्रपटांकडून अनेक ऑफर आल्या. मात्र मला वाटते की बॉलिवूडच्या निर्मात्यांना मी परवडू शकत नाही. यासाठी मी माझा वेळ वाया नाही घालवू इच्छित. तेलगू चित्रपटांनी मला जे प्रेम आणि स्टारडम दिले, त्याची मी कधीच कल्पना देखील नव्हती केली. मी नेहमीच विचार करायचो की मी इथे चित्रपट बनवेल आणि त्याला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळेल, आणि मला विश्वास आहे की, असे होत आहे. मला याचा आनंद आहे.”

View this post on Instagram

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित असलेला ‘मेजर’ या सिनेमाची निर्मिती सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, महेश बाबूच्या जीएमबी एंटरटेनमेंट आणि ए+एस यांनी मिळून केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post