सावनी रवींद्रने केले मुलीसोबत फोटो शेअर पाहून तुम्हीही म्हणाल, ‘गायिकेची मुलगी शोभते’


गायिका सावनी रवींद्र हिने या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिच्या मुलीच्या जन्मानंतर तिने मुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती प्रेग्नेंट होती तेव्हापासूनच तिने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच सावनीने तिच्या मुलीसोबत अत्यंत गोड फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तुम्ही नक्की म्हणाल की, गायिकेची मुलगी शोभत आहे.

सावनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहे. तिने तिच्या मुलीसोबत शार्वीसोबत काही गोड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, सावनी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये दिसत आहे. तसेच तिच्यासोबत तिची मुलगी देखील दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे शार्वीने देखील तिच्या आईप्रमाणे हेडफोन लावले आहेत. या फोटोमध्ये शार्वी खूपच गोड दिसत आहे. हे फोटो शेअर करून सावनीने कॅप्शन दिले आहे की, ” स्टुडिओमध्ये माझ्यासोबत कोण आहे, ते पाहत आहे की, मम्मा! मला पण गाऊ दे” तिने पुढे लिहिले की, “3 सुंदर तमिळ ट्रॅक रेकॉर्ड केले! जेव्हा तुमचे बाळ स्टुडिओच्या वेळेचा आनंद घेते आणि ते अधिक मनोरंजक बनवते तेव्हा हा एक आशीर्वाद असतो.” (savaniee ravindraa share a photos with her daughter)

सावनीने या वर्षी ६ ऑगस्टला शार्वीला जन्म दिला आहे. त्यानंतर तिने सोशल मीडियावर ही माहिती दिली. तसेच मुलीच्या बारशाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर अनेक सणांना देखील तिने फोटो शेअर केले होते. अशातच तिचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

सावनी ही एक उत्तम गायिका आहे. तिने अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तिने राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवला आहे. संगीत क्षेत्रात ती नेहमीच नवीन नवीन प्रयोग करत असते.

हेही वाचा :

बिग बॉस मराठीच्या घरातून मीरा जगन्नाथची एक्झिट, शोला मिळाले टॉप ५ स्पर्धक

‘कल हो ना हो’मधील शाहरुखची छोटी मैत्रीण झालीय खूपच मोठी, तुमचाही डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

बॉक्स ऑफिसवर यशच्या ‘केजीएफ चॅप्टर-१’वर वरचढ ठरला अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’, पाहा दिवसानुसार कमाई 

 

 


Latest Post

error: Content is protected !!