×

शाहरुखच्या ‘मन्नत’ जवळील २१ मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘मन्नत’ या बंगल्याजवळ असलेल्या २१ मजली निवासी इमारतीला सोमवारी (९ मे) संध्याकाळी भीषण आग लागली. अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. मात्र सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग २१ मजली इमारतीच्या १४व्या मजल्यावर लागली आहे. या आगीला ‘लेव्हल-टू फायर’ म्हणून वर्गीकृत केले आहे. अग्निशमन दलाला संध्याकाळी ७.४५ दरम्यान याची माहिती मिळाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, सात जंबो टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी त्वरित दाखल झाल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), अडाणी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. आग अद्याप आटोक्यात आली नसून, तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Latest Post