Tuesday, July 23, 2024

शंभराहून अधिक कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने केलेला शाहरुखचा घात, सोसावे लागलेले मोठे नुकसान

बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थातच शाहरुख खान हा इंडस्ट्रीतील ‘रोमान्स किंग’ म्हणून देखील ओळखला जातो. तो इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान यांच्या जोडीने धमालच केली होती, दुसऱ्यांदा त्यांच्या जोडीला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि याची भरपाई देखील करावी लागली होती. चला तर जाणून घेऊया पूर्ण माहिती.

शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची जोडी पहिल्यांदाच ‘रब ने बना दी जोडी’ (Rab Ne Bana Di Jodi) या चित्रपटात झळकली होती. यानंतर ही जोडी ‘जब तक है जान’ यामध्येही दिसली. या जोडीने बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. मात्र, या जोडीला एका चित्रपटामध्ये प्रेक्षकांनी नापसंत केले होते. या चित्रपटातील शाहरुखचा रोमांटिक अंदाज प्रेक्षकांना भावला नाही आणि यामुळे अभिनेत्याला मोठ्या नुकसानाची भरपाई करावी लागली होती.

शाहरुख आणि अनुष्का यांचा ‘जब हॅरी मेट सेजल’  हा चित्रपट इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट 4 ऑगस्ट, 2017 रोजी प्रदर्शित केला होता. या चित्रपटाचे शूटिंग प्राग अमरस्टरडम, विएना, लिस्बन आणि बुडापेस्ट या सुंदर ठिकाणी झाले आहे. मात्र, या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाची स्टोरी आणि दिग्दर्शन कुठेतरी कमी पडल्याने या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाला नुकसान भरपाई करावी लागली होती. हा चित्रपट गौरी खान आणि शाहरुख खान यांच्या रेड चिली एंटरटेनमेंटमध्ये प्रदर्शित केला होता.

या चित्रपटामध्ये महागडे कलाकार तर होतेच आणि शूटिंग परदेशात केल्याने या चित्रपटाचे बजेट खूप जास्त वाढले होते. आयएमडीबी वेबसाईटनुसार, या चित्रपटाचे बजेट 119 कोटी इतके होते आणि चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर फक्त 62 कोटीची कमाई केली होती. यामुळे या चित्रपटाला मोठा तोटा झाला होता. ‘जब वी मेट’ सारखा चित्रपट बनवनारे इम्तियाज अली यांना खूप मोठा धक्का बसला होता. याच्यानंतर शाहरुख खान काही खास चित्रपटामध्ये झळकताना दिसला नाही.

शाहरुख खान त्याचा चित्रपट जोरदार आपटल्यापासून तो पुन्हा चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. येणाऱ्या काळात ‘डंकी’, ‘जवान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रणवीरचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘कॅटरिना आणि दीपिका औकातीच्या बाहेरच्या’
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉपची जबाबदारी घेणार, आमिर खानने नाकारले मानधनाचे इतके कोटी
सलमान खानसोबत ‘ही’ अभिनेत्री होस्ट करणार बिग बॉस 16? नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकित

हे देखील वाचा