रश्मिका मंदानाने (Rashmika Mandana) बुधवारी तिच्या इंस्टाग्राम पेजवर ‘कॉकटेल २’ चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर केले. यामध्ये ती, कृती सॅनॉन आणि शाहिद कपूर सुट्टीच्या मूडमध्ये दिसत आहेत. रश्मिकाने चित्रपटातील ‘जब तलक’ या गाण्याच्या प्रदर्शनाची माहितीही दिली.
रश्मिका मंदानाने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले आहे, “‘जब तकक’ हे गाणे ८ एप्रिलला प्रदर्शित होईल.” या गाण्यात प्रेक्षकांना कृती सॅनॉन, शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना एका वेगळ्या शैलीत पाहायला मिळतील. पोस्टरमधील या तिन्ही कलाकारांचा लूक गाण्यातही दिसण्याची शक्यता आहे.
निर्मात्यांनी नुकतीच ‘कॉकटेल २’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. ‘कॉकटेल २’ हा होमी अदजानिया दिग्दर्शित एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे.
‘कॉकटेल २’ हा २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. त्या चित्रपटात दीपिका पदुकोण, डायना पेंटी आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘कॉकटेल २’ मध्ये शाहिद कपूर, क्रिती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वीचा चित्रपट ‘कॉकटेल’ प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरला होता आणि बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कामगिरी केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘रामायण’च्या रिलीजपूर्वी रणबीरला चाहत्याकडून मिळाली खास भेट, भेट वस्तुवर प्रभू रामांची आहे झलक


