कोणत्या अभिनेत्याचा आहे हा मुलगा? ज्याचा विनाशर्ट फोटो इंस्टाग्रामवर घालतोय धुमाकूळ


बॉलिवूड रोमँटिक हीरो शाहरुख खान आपल्या स्टाईलमुळे आणि चित्रपटातील रोमान्समुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्यासोबत आता त्याचा मुलगा ‘आर्यन खान’ देखील प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करत आहे. आर्यन हा स्टारकीड आहे परंतु त्याला प्रेक्षकांसमोर यायला आणि स्पॉटलाईटमध्ये राहायला अजिबात आवडतं नाही. त्याला आवडत असले किंवा नसले तरी त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच आर्यनचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्या फोटोत आर्यनने शर्ट घातला नाहीये.

या फोटोत आर्यन आपल्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे, ज्यात त्याने शर्ट घातला नाहीये. हा फोटो सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत आर्यनची बॉडी एकदम फिट दिसत आहे. तो त्याच्या मित्रांसोबत एका नावेमध्ये उभा आहे. आर्यनचा या लूकला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळत आहे.

आर्यनचा हा फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. याआधी देखील आर्यनचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्या फोटोत तो इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीझनसाठी केकेआरच्या ऍक्शन टेबलवर बोली लावताना दिसत होता. या वेळेस तो जुही चावलाची मुलगी जान्हवी सोबत दिसला होता. आर्यनचा लूक कोणत्याही अभिनेतापेक्षा कमी नाहीये, परंतु त्याला अभिनेता बनण्यात काहीही रस नाहीये.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.