Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ अभिनेत्रींनी गाजवल्या देवींच्या भूमिका, अक्राळविक्राळ रुपे पाहून प्रेक्षकांचाही उडाला थरकाप

सध्या सगळीकडेच देवीचा जल्लोष पहायला मिळत आहे. देवी म्हटलं की, दांडिया गर्बा, आणि अनेक छोटेमोठे कार्यक्रम देवीच्या भक्तीमध्ये केले जातात. त्यामुळे साधारण व्यक्तीपासून ते सेलिब्रिटीपर्यत देवीचा महोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जोतो. यासोबत अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये देवीचे कार्यक्रम दाखवले होते. या मालिकांना प्रेक्षकांनी आवर्जून प्रतिसाद दिला आहे. यामध्ये अनेक अभिनेत्रींनी देवीची भुमिका बजावली आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या अभिनेत्रींनी देवीची भूमिका साकारली होती.

सोनारिका भदौरिया – लोकप्रिय अभिनेत्री सोनारिका भदौरिया(Sonarika Bhadoria) हिने टेलिव्हिजनवरील ‘देवों के देव महादेव’ या कार्यक्रमामध्ये देवीची भुमिका साकारली होती. तिने आपल्या दमदार अभियाने या भुमिकेला आपलेसे करुन घेतले होते. सोनारिकाने हे पात्र एवढे सुंदर निभवले होते की, आजही या भुमिकेचे कौतुक केले जाते. तिने या कार्यक्रमामध्ये माता काली पासून ते देवी दुर्गापर्यतच्या भुमिका निभावल्या होत्या

मौनी रॉय- अभिनेत्री मौनी रॉय(Mouni Roy) ही आता बॉलिवूडमध्ये गेली आहे. तिने नुकताच प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. यापूर्वी टेलिव्हिजनवर काम करत असताना मौनी रॉयने देखिल ‘देवों के देव महादेव’ या कार्यक्रमामध्ये देवी सतीची भुमिका निभावली होती.

आकांक्षा पुरी- गायक मिका सिंग याची होणारी बायको आकांक्षा पुरी(Akanksha Puri) हिने ‘विघ्नहर्ता’ या कार्यक्रमामधील देवी पार्वती बनून लोकांचे मनोरंजन केले होेते. तिने केलेल्या भुमिकेतील अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते.

रति पांडे- या लिस्ट मध्ये रति पांडे(Rati Pandey) देखिल नाव आहे. या अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये देवीच्या भुमिका निभावल्या आहेत. ‘आदि पराशक्ती’ या मालिकामध्ये देवी दुर्गाची भुमिका निभावली होती. याव्यतिरिक्त या अभिनेत्रीने ‘मिले जब हम तुम’, ‘हिटलर दीदी’, ‘शादी मुबारक’, सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

मदिराक्षी मुंडले- टीव्ही अभिनेत्री मदिरा मुंडले(Madirakshi Mundle )तिने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे ज्यामध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका निभावल्या होत्या. मदिराक्षी मालिका ‘विघ्नहर्ता गणेश’ याचाही भाग होती. या मालिकामध्ये तिने माता पार्वताची भुमिका बजावली होती ज्यामुळे अनेकांनी तिची प्रशंसा केली होती.

पुजा शर्मा- टीव्ही अभिनेत्री पुजा शर्मा (Pooja Sharma)हिने आई दुर्गादेवीची भुमिका बजावली होती. यानंतर तिने ‘महाकली’ या मालिकेतही दुर्गाच्या नऊ रुपांची भुमिका केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘राहायला घर नव्हते, उपाशी राहुन काढले दिवस…’, बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला संघर्षमय प्रवास
तुषार कालिया ठरला ‘खतरों के खिलाडी १२’चा विजेता, ट्रॉफी कारसह मिळाली ‘एवढी’ रोख रक्कम
रोजंदारीवर काम करणारी वर्षा बुमराह ठरली ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ ची विजेत

हे देखील वाचा