पुजा शर्मा आधी ‘या’ ७ समलिंगी कलाकारांनी गाजवले आहेत ‘बिग बॉस’चे सिझन


टीव्ही इंडस्ट्रीमधला सर्वात विवादित रियालिटी शो म्हणून बिग बॉसचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. बिग बॉसचे आतापर्यंत १४ पर्व झाले असून, हे सर्व १४ पर्व वादविवादांमुळे तुफान गाजले. लवकरच बिग बॉसचे १५ वे पर्व येणार आहे. या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची आतापासूनच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या या पर्वासाठी अनेक मोठमोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार या पर्वात सहभागी होणार आहे.

या पर्वासाठी पूजा शर्मा हे नाव सध्या जोरदार चर्चांमध्ये आहे. ट्रान्सजेंडर असलेली पूजा शर्मा या सीझनमध्ये दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. आपल्या ड्रेसिंग स्टाइलमुळे प्रकाशझोतात आलेल्या पूजाला सोशल मीडियावर भरपूर फॉलोवर्स आहे. पूजेची ड्रेसिंग स्टाईल पाहिल्यावर आपल्याला सदाबहार अभिनेत्री रेखा यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. पूजा या शोमध्ये सहभागी होणारी पहिलीच ट्रान्सजेन्डर किंवा समलिंगी स्पर्धक आहे असे नाही, याआधी देखील अनेक ट्रान्सजेन्डर लोकांनी या शोमध्ये सहभाग घेतला होता. आज या लेखात आपण त्याच कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

बॉबी डार्लिंग :
हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध कलाकार म्हणून बॉबी डार्लिंग ओळखली जाते. तिने बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सहभाग नोंदवला होता. या शोमध्ये ती अनेकदा वादांमध्ये अडकली होती. २३ व्या वर्षी तिने समलैंगिक व्यक्तीचे १८ रोल केल्याने तिचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

रोहित वर्मा :
रोहितने या शोच्या तिसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. रोहित हा फॅशन डिझायनर असून, या शोच्या तिसऱ्या पर्वात रोहित वर्मा आणि अभिनेता कमाल आर खान यांच्या मोठा वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की केआरकेने रोहितच्या डोक्यावर बाटली फोडली होती. त्यानंतर केआरकेला लगेच शोमधून बाहेर काढण्यात आले होते.

लक्ष्मी नारायण त्रिपाठी :
या प्रसिद्ध सामाजसेवक आहेत. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला होता. बिग बॉससोबतच लक्ष्मी यांनी ‘दस का दम’ आणि ‘राज पिछले जनम का’ या शोमध्ये देखील सहभाग घेतला आहे.

इमाम सिद्धकी :
फॅशन स्टायलिस्ट इमाम सिद्धीकी बिग बॉसच्या सहाव्या पर्वात दिसला. याने शाहरुख खानच्या यशात माझा हात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सलमानने त्याला खूप ऐकवले होते.

विवेक मिश्रा :
विवेक बिग बॉसच्या सातव्या पर्वात दिसला होता. विवेक मिश्रा योगगुरु आणि एलजीबीटी राइट्स एक्टिविस्ट आहे विवेक ‘न्यूड योग गुरु’ नावाने देखील ओळखला जातो. विवेकने श्वेता तिवारीच्या पहिल्या पतीवर बलात्काराचा आरोप लावला होता.

वीजे एंडी :
प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी असलेल्या वीजे एंडीने बिग बॉसच्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. विजय कुमार हे एंडीचे पूर्ण नाव होते. एंडीने अनेक टीव्ही शो चे सूत्रांचालन केले आहे.

सुशांत दिवगिकर :
सुशांत मिस्टर गे इंडिया राहिला आहे. २०१४ साली त्याने हा ‘किताब स्वतःच्या नावावर केला. सुशांत मॉडेल देखील असून तो आठव्या सीझनमध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारने चित्रपटाची फी कमी केली?? पसरलेल्या या बातम्यांना अभिनेत्याने ‘अशाप्रकारे’ दिले सडेतोड उत्तर

-सुशांतच्या आठवणीत रिया चक्रवर्ती झाली भावुक; म्हणाली, ‘तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही…’

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.