Thursday, April 25, 2024

‘याच खड्ड्यात जीव द्या…’, अभिनेता शशांक केतकरचा संताप, पाहा काय आहे प्रकरण?

मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाइतकेच सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलेच चर्चेत येत असतात. सोशल मीडियावरुन अनेक सामाजिक प्रश्नांवर मुद्द्यांवर ते रोखठोक मत मांडताना दिसत असतात. यामध्ये प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता शशांक केतकरचेही नाव प्रामुख्याने घेतले जाते. शशांक केतकर त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलाच चर्चेत येत असतो. सध्या त्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने राजकीय नेत्यांना चांगलेच खडेबोल सुणावले आहेत. 

शशांक केतकर (Shashank Ketkar) हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि लूकने त्याने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शशांक सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. सध्या त्याचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये शशांकने मुंबईच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था दाखवत सत्ताधाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

अभिनेता शशांकने शेअर केलेला हा व्हिडिओ मुंबईमधील मालाड परिसरातील आहे. या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे दाखवत शशांकने राजकारण, पक्ष बाजूला ठेवत एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा रस्त्यांमुळे महागड्या गाड्यांचे मोठे नुकसान होत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही त्याने सांगितले आहे. तब्बल सहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्याने राजकीय नेत्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करत शशांकने चार मुद्दे ही कॅप्शनमध्ये मांडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

मुद्दा क्र. 1 – तू मूळचा पुण्याचा आहेस… तिथल्या रस्त्यांची काळजी कर तू. आम्हाला नको अक्कल शिकवू वगैरे म्हणणार्‍या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या ????

मुद्दा क्र. 2 – हा video मुळात कोणाच्या तरी support साठी आणि कोणाला तरी विरोध म्हणून केलेला नाही. हे प्रश्न जनतेचे आहेत आणि ते फक्त एका शहरा पुरते मर्यादित नाहीत. हे देशातल्या सगळ्या roads बाददल माझं म्हणण आहे.
मुद्दा क्र 3 – रस्त्याच्या अशा अवस्थेला जे जबाबदार असतात त्यांनी एकदा हे imagine करून बघाव की ते त्यांच्या लहान मुला मुलीला या international school मध्ये सोडायला bike वरून आले आहेत किंवा म्हातार्‍या आई बाबांना डॉक्टर कडे घेऊन आले आहेत किंवा बायको बरोबर आहेत किंवा अगदी एकटे आहेत आणि ती तुमची bike या खड्यात अडकून बंद पडली, तुमचा तोल गेला, मागून bus आली आणि तुमच्या डोक्याचा चुरा करून गेली! एकदा imagine करा ही भीती!

दरम्यान शशांकची ही पोस्ट आणि त्याने दिलेले हे कॅप्शन सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
हेही वाचा- ‘या’ भितीने ठोकला अभिनयाला रामराम, ‘दिया और बाती’ फेम दीपिका सिंगने केला मोठा खुलासा
ना काश्मीर फाईल्स, ना आरआरआर; भारताकडून ऑस्करसाठी यंदा ‘या’ गुजराती चित्रपटाने मारली बाजी
सोनम आणि आनंद आहुजा यांच्या बाळाचं नाव ठरलं; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा