घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य आले समोरासमोर, एकमेकांपासून नजर चोरत निघून जाणे केले पसंत


दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांची जोडी आता तुटली आहे. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला असून, अद्यापही कारवाई सुरू आहे. जरी ते वेगळे झाले असले, तरी ते अजूनही चांगले मित्र असल्याचे दोघांनी सांगितले होते. पण तसे दिसत नाही. अलिकडेच हे एक्स जोडपे एकाच ठिकाणी शूटिंग करताना दिसले. पण दोघांनीही एकमेकांपासून दूर राहणे पसंत केले. दोघांनीही आपापले काम केले, त्यानंतर ते परतले. त्याचवेळी दोघेही एकमेकांशी नजर चोरताना दिसले.

समंथा-नागा एकमेकांशी दिसले नजर चोरताना

माध्यमांतील वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगच्या संदर्भात हैदराबादच्या रामनायडू स्टुडिओमध्ये गेले होते. यावेळी दोघेही एकमेकांशी नजर चोरताना दिसले. समंथा तिच्या आगामी ‘यशोदा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना, नागा ‘बंगराजू’ चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने स्टुडिओमध्ये पोहोचला होता. या चित्रपटात तो वडिलांसोबत काम करत आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, दोघांनीही आपल्या टीमला सांगितले होते की, शूटिंग स्टुडिओमध्ये दोघांमध्ये भांडण होऊ शकत नाही. दोघांनीही एकमेकांना त्रास न देता आपापले शूट पूर्ण केले आणि घरी गेले. विभक्त झाल्यापासून दोघेही त्यांच्या व्यावसायिक जीवनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. २ ऑक्टोबर रोजी या जोडप्याने घटस्फोटाची घोषणा केली. यानंतर नागाचे वडील आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुनही खूप उदास झाले होते. त्यांनी याला दुर्दैवी म्हटले.

लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या अवघ्या ४ दिवस आधी झाले विभक्त

समंथा आणि नागा यांनी ३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्न केले. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या अवघ्या ४ दिवस आधी हे जोडपे कायमचे वेगळे झाले. दोघांच्याही चाहत्यांना यामुळे खूप दुःख झाले. समंथानेही तिच्या नावावरून अक्किनेनी काढून टाकले आणि रुथ प्रभूला परत जोडले. समंथा नुकतीच एका मुलाखतीत म्हणाली होती की, आता ती तिच्या घटस्फोटाच्या प्रश्नांना कंटाळली आहे आणि आता तिची पुढे जाण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा :

बेगानी शादी मैं ‘मिका’ दिवाना, न बोलवताच लग्नात पोहचले मिका आणि राहुल, त्यांना बघून उडाला कल्ला

‘ही दोस्ती तुटायची नाय’, विकासने दिल्या विशालला भावी आयुष्याच्या शुभेच्छा

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जींचे डोहाळे जेवण झाले संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल 


Latest Post

error: Content is protected !!