Monday, July 20, 2026
Home बॉलीवूड शिल्पा शेट्टीची मुंबई हाय कोर्टाला आर्त हाक, मीडियावर लावला प्रतिमा खराब करण्याचा आरोप

शिल्पा शेट्टीची मुंबई हाय कोर्टाला आर्त हाक, मीडियावर लावला प्रतिमा खराब करण्याचा आरोप

मागील काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा मीडियामध्ये चांगलेच गाजत आहे. अश्लील चित्रपट निर्मिती, त्याचा प्रसार या गुन्ह्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने अटक केली आणि बॉलिवूडसोबत उद्योगजगतात एकच खळबळ उडाली. या राज कुंद्रा प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीचेही नाव मीडियामध्ये घेतले जात आहे.

मीडियामध्ये या प्रकरणावर जे कव्हरेज दाखवले जात आहे, त्यामध्ये शिल्पा शेट्टीची प्रतिमा खराब दाखवली जात आहे, असा आरोप शिल्पाने केला आहे. तिने मीडियावर मानहानीची तक्रार दाखल केली आहे. शिल्पाचा एवढ्या दिवसांचा संपूर्ण राग तिने मीडियावर काढला असून, शिल्पाने मुंबई हाय कोर्टात २९ पत्रकार आणि काही मीडिया हाऊस विरोधात मानहानीची केस दाखल केली आहे. पॉर्नोग्राफी केसवर खोटे रिपोर्टिंग करत तिची समाजातील प्रतिमा खराब केली जात आरोप केला आहे, असे शिल्पाने सांगितले. (shilpa shetty has filed defamation suit in bombay high court against media houses)

सोबतच शिल्पाने कोर्टात ही मागणी देखील केली आहे की, मीडियामध्ये तिच्या विरोधात दाखवल्या जाणाऱ्या अपमानजनक गोष्टींना थांबवले जावे. शिल्पाने हा देखील दावा केला आहे की, मीडिया हाऊसने जास्त हिट्स मिळवण्याच्या नादात सनसनीखेज बातम्या अपलोड केल्या आहेत. राज कुंद्राच्या विरोधात सुरु असणाऱ्या केसला घेऊन शिल्पाच्या विरोधात चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहे.

शिल्पाने कोर्टात सांगितले आहे की, मीडियाने आतापर्यंत तिच्याविरोधात प्रकशित केलेला सर्व अपमानजनक कन्टेन्ट काढून टाकून, तिची विनाअट माफी मागावी. शिल्पाने फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगल यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल आहे. मीडियाने तिच्या खासगी आयुष्याचे उल्लंघन केले असून, तिच्या आयुष्याबद्दल खोटी आणि अपमानजनक माहिती दिली आहे, असे तिचे म्हणणे आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राचा आणि त्याचा सहकारी रायन थारपचा कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. या दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने, मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी सात दिवसांचा पोलिस रिमांड मागितला होता. मात्र, कोर्टाने तिसऱ्यांदा रिमांड मंजूर करण्यास नकार दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा