Thursday, April 18, 2024

…जेव्हा श्रद्धा कपूर अन् रोहन श्रेष्ठ यांचे झाले हाेते ब्रेकअप, 4 वर्षाच्या प्रेमाला दिला पूर्णविराम

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची ती अभिनेत्री आहे, जी अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. श्रद्धाने तिचे रिलेशनशिप स्टेटस कधीच उघड केले नाही, पण प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा बीटाउनमध्ये आहेत. दोघेही एकमेकांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते आणि बातमीही आली होती की, दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दरम्यान अशी माहिती हाती आली आहे की, 4 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे वेगळे झाले आणि ब्रेकअप झाले.

जेव्हा-जेव्हा श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ दोघंही एकत्र दिसायचे, तेव्हा चाहत्यांना वाट पाहायचे की, कदाचित यावेळी दोघेही आपले नाते अधिकृत करतील. दोघेही तसे नसले तरी आता 4 वर्षांचे नाते संपवून दोघेही पुढे सरसावले असल्याची बातमी आहे. माध्यमातील वृत्तानुसार त्या दोघांनी आता त्यांचा मार्ग वेगळा झाला आहे. या दोघांच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, रोहन श्रेष्ठ गोव्यात श्रद्धा कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला देखील नव्हता

सन 2022 सालापासून दोघांमध्ये वाद सुरू होता आणि फेब्रुवारीमध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तरीही त्यांच्या ब्रेकअपचे कारण काय? याचा अद्याप खुलासा झालेला नाही आणि दोघांपैकी कोणीही ब्रेकअपबाबत अधिकृतपणे काहीही बोलले नाही.

श्रद्धा कपूरचे वडील आणि अभिनेता शक्ती कपूर यांनी एका मुलाखतीत रोहनबद्दल बोलताना सांगितले की, तो खूप चांगला मुलगा आहे आणि त्याचे घरात येणे लहानपणापासून आहे. लग्नाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “हे मला श्रद्धाने सांगितले नाही की, ती त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करत आहे. माझ्यासाठी ते अजूनही बालपणीचे मित्र आहेत आणि ते एकमेकांबद्दल सिरिअस आहेत की नाही हे देखील मला माहित नाही.” परंतु आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या हाती येत आहेत. त्यामुळे श्रद्धा कपूरच्या चाहत्यांना वाईट वाटत आहे.(shraddha kapoor breaks up with rumoured boyfriend rohan shrestha after dating for almost 4 years)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सर्वांना हसवणाऱ्या कपिल शर्मामुळे रडले कोरियन चाहते, कारण ठरला आगामी सिनेमा; बातमी वाचाच

‘प्राजु गुलाबापेक्षाही खूप सुंदर आहे’ म्हणत फॅनने घातली चक्क प्राजक्ता माळीला लग्नाची मागणी

हे देखील वाचा