‘माझी राणी’, म्हणत सिद्धार्थने मितालीसोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट


अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणारं जोडपं आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून चांगलेच पसंत केले जातात. शिवाय ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. काही महिन्यांपूर्वी हे जोडपं रेशीमगाठीत अडकलं आहे. हे दोघे नेहमी एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यांच्यामधील मजेदार आणि रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांना भावते.

सिद्धार्थ बऱ्याचदा पत्नी मितालीसाठी पोस्ट शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता, की मिताली खिडकीपाशी बसलेली आहे. सिद्धार्थ किचनमध्ये जातो आणि शेगडीवर असलेलं स्टँड उचलतो. ते स्टँड तो मुकूट म्हणून मितालीच्या डोक्यावर ठेवतो. (siddharth chandekar and mitali mayekar’s funny video goes viral)

सिद्धार्थचे हे वागणे पाहून मिताली देखील चकित होते आणि जोरजोरात हसू लागते. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “क्राऊन लिट…परवडणारे आणि मस्त! सोबतच त्याने मुकूट आणि माझी राणी हे हॅशटॅगही दिले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही लोटपोट झाले आहेत. कलाकारांनी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अलीकडेच सिद्धार्थने ‘तुझी प्रत्येक गोष्ट आवडते’ म्हणत मितालीसाठी एक अतिशय खास आणि रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने तिच्याप्रति त्याच्या भावना आणि प्रेम सर्वकाही व्यक्त केलेलं पाहायला मिळालं. चाहत्यांने देखील या पोस्टला भरभरून प्रेम दिलं होतं.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नऊ वर्षांपूर्वी विकी कौशलने दिले होते त्याचे पहिले ऑडिशन; आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते गणना

-आजीच्या निधनाने पुरती तुटली आहे अनन्या पांडे; महिला दिनानिमित्त शेअर केली होती आजीसोबतची शेवटची पोस्ट

-जोर धरू लागलीय फरहान अख्तरनच्या ‘तूफान’ला बॉयकाट करण्याची मागणी; ट्विटरवर ट्रेंड होतोय #boycotttoofaan


Leave A Reply

Your email address will not be published.