Friday, July 12, 2024

जरा इकडे पाहा! ‘दम मारो दम’ अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘ती आजही सुंदर…’

अभिनेत्री झीनत अमान या त्यांच्या काळातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक हाेत्या. झीनत यांनी त्यांच्या अभिनयाने आणि साैंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्मान केले. आजही त्या कुठे स्पॉट झाल्या की, लोकांना त्यांच्या सौंदर्यांची भुरळ पळते. 70 वर्षीय झीनत अमान या काही दिवसांपुर्वी मुंबई विमानतळावर दिसल्या हाेत्याे, ज्याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे.

झीनत (zeenat aman) यांचा हा व्हिडिओ पाहून चाहते त्यांच्या सौंदर्यावर भारावून गेले आहेत आणि व्हायरल व्हिडिओवर सतत कमेंट करत तिच्या ग्लॅमर आणि सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने कमेंट करत लिहिले की, “आजही तितकीच सुंदर”, तर दुसऱ्याने चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “आमच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री.” पण फार कमी लोकांना हे माहिती असेल की, झीनत चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी पत्रकार हाेत्या. त्यानंतर त्या मॉडेल बनल्या आणि मग हळूहळू अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये नाव कमावले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

झीनत अमानचा पहिला चित्रपट 1970 मध्ये आला होता. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी ‘द एव्हिल विदिन’ आणि ‘हस्टल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. झीनत अमान यांना खरी ओळख देव आनंदमुळे मिळाली. देव आनंदने त्यांना ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. या चित्रपटाने झीनत अमानला रातोरात प्रसिद्ध केले. या चित्रपटातील प्रत्येक गाणे सुपरहिट ठरले. विशेषतः ‘दम मारो दम’ हे आजही पार्टी गाणे आहे.

याशिवाय या चित्रपटातील त्याचा लूकही लोकांनी कॉपी केला होता. झीनत अमान ही त्यांच्या काळातील सर्वात बोल्ड अभिनेत्री मानली जाते. त्यांना त्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीचा मॉडर्न फेस म्हटले जायचे. त्यांनी 1970-80 च्या दशकात स्लिट स्कर्ट आणि स्विमसूट घालून लोकांना थक्क केले. झीनत अमान यांना 1970-80 च्या दशकातील ट्रेंड सेटर मानले जाते. असे म्हटले जाते की, झीनत अमाननेच नंतरच्या अभिनेत्रींना बोल्ड लूक स्वीकारणे सोपे केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा पितृसत्तेचा विरोध करत मल्लिकाने झापले वडिलांना; म्हणाली होती, ‘तू मला जन्म दिलास म्हणून…’

जगावेगळंच! मल्लिका लवकर झोपते म्हणून बॉयफ्रेंडला असते ‘ही’ तक्रार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

हे देखील वाचा