Friday, March 29, 2024

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी पुन्हा झाल्या जाग्या, हिमांशी खुरानाने व्यक्त केली मनातील भावना

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाझ गिल पूर्णतः खचून गेली होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिच्यासाठी काळजी व्यक्त केली. या परिस्थितीमध्ये शहनाझचे आधी वाद राहिले होते, अशा व्यक्ती देखील तिच्या सांत्वनासाठी धावून आल्या. त्यातीलच एक हिमांशी खुराना. शहनाझला या परिस्थितीमधून सावरण्यामध्ये सिद्धार्थच्या आई रिता शुकला यांचा मोठा वाटा आहे, असे सांगताना हिमांशी नुकतीच समोर आली.

‘बिग बॉस १३’मध्ये जाण्याआधीच अभिनेत्री आणि प्रसिद्ध गायिका हिमांशीचे शहनाझबरोबर वाद राहिले होते. अशात या दोघींनी एकत्र एकमेकींना बिग बॉसच्या घरामध्ये पाहिल्यानंतर दोघींना देखील मोठी चिंता लागली होती. मात्र, काही दिवसांनी या दोघींमध्ये मैत्री झाली. बिग बॉसच्या घरामध्ये हिमांशीची असिम रियाजबरोबर चांगलीच मैत्री जमली होती. या दोघांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एक म्युझिक व्हिडिओ देखील बनवला होता. एकीकडे सिद्धार्थ आणि शहनाझच्या प्रेमकहानीची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे हिमांशीचे नाव असिम रियाजबरोबर जोडले जात होते.

हिमांशीने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली की, “सिद्धार्थच्या आई आणि मी नेहमी सिडनाजविषयी बोलत असायचो. सिद्धार्थ गेल्यानंतर त्याच्या आईनेच शहनाझला सांभाळले आहे. शहनाझने तिच्या आयुष्यात असा दुःखद प्रसंग पहिल्यांदाच पाहिला होता, पण आता ती यामधून हळूहळू बाहेर येत आहे आणि ती आधीपेक्षा आता मनाने मजबूत देखील झाली आहे.”

पुढे धर्माविषयी सांगत ती म्हणाली की, “आमच्या धर्मामध्ये जी व्यक्ती मृत पावते ती सर्व बंधनातून आणि नात्यांमधून मुक्त होते. आम्ही सर्व कायमच सिद्धार्थच्या चांगल्या आठवणी मनामध्ये ठेऊ, पण आता शहनाझला पुन्हा त्या दुखःत ढकलणे योग्य नाही.”

त्यानंतर रीता शुक्ला यांच्याविषयी बोलताना ती म्हणाली की, “शहनाझला एका मोठ्या आधाराची गरज आहे आणि मी खूप आनंदी आहे. कारण सिद्धार्थची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. असिम सिद्धार्थच्या अंत्यदर्शनासाठी गेला होता. त्यावेळी त्याने मला सांगितले की, सिद्धार्थच्या आई एक धीट आणि खंबीर महिला आहेत.”

हिमांशीप्रमाणे आजही सिडनाझचे अनेक चाहते शहनाझला या परिस्थितीमधून सावरल्याबद्दल रीता शुक्ला यांचे आभार व्यक्त करतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-छठ पूजेच्या गाण्यासाठी सोनू निगमची भोजपुरी गायक पवन सिंगला साथ, दोघे मिळवून गाणार धमाकेदार गाणे

-आगामी ‘८३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अभिनेता खूपच उत्सुक; म्हणाला, ‘…क्रिकेटच्या मैदानात रूपांतरित करेल’

-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो

हे देखील वाचा