छठ पूजेच्या गाण्यासाठी सोनू निगमची भोजपुरी गायक पवन सिंगला साथ, दोघे मिळवून गाणार धमाकेदार गाणे


पवन सिंगच्या आवाजाची जादू आज पूर्ण भारतभर पसरलेली दिसते. त्याच्या आवाजाने त्याने आतापर्यंत लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. एवढेच नाही, तर अन्य भाषांमध्ये देखील तो उत्तम गाणे गातो. नुकतेच त्याने बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या एका चित्रपटासाठी ‘लूट गाये’ हे गाणं गायलं आहे. पवन बिहारमधील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या छठ पूजेसाठी देखील तो एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. सध्या या सर्वांच्या तयारीमध्ये असतानाच त्याचा एक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे यामध्ये बॉलिवूडचा एक प्रसिद्ध गायक देखील दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध गायक सोनू निगम दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघांनी देखील पारंपरिक कुर्ता परिधान केलेला असून या अवतारात ते दोघेही खूप छान दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पवन सोनू निगम बरोबर गाण्याच्या शब्दांमधून संवादसाधत असल्याचे दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे आता सोनू निगम देखील या नवीन गाण्यामध्ये झळकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

व्हिडिओसह जो फोटो व्हायरल होत आहे आहे त्यामध्ये बॉलिवूड यशी फिल्म्सचे एमडी अभय सिन्हा, निर्माते निशांत जम्मूवाला, पंकज तिवारी, दिग्दर्शक रवि पंडित देखील दिसत आहेत. रवी पंडित यांनी पवन सिंग बरोबर ‘पुदीना ए हसीना’ अशा गाण्यांमध्ये एकत्र काम केले आहे.

पवन छट पूजेसाठी जे गाणं गाणार आहे त्याचे बोल ‘पहिनला पियरिया, बांध लगा पगरिया’ असे आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि फोटो पाहून या गाण्यामध्ये सोनू निगमची पवनला साथ मिळेल असे म्हणायला हरकत नाही. हा व्हिडिओ देखील पवनने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सिनेसृष्टीतील पवन सिंगच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास संगीतासह त्याने अभिनय क्षेत्रातही स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आजवर ‘प्यार बिना चैन कहा’, ‘रंगबाज दरोगा’, ‘देवर भाभी’, ‘सिंदूर दान’, ‘जिद्दी आशिक’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी


Leave A Reply

Your email address will not be published.