Sunday, July 14, 2024

तोकडे कपडे घालून गणपती दर्शनाला पोहोचली गायिका, मंडळाने केली अशी फजिती

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोश पाहायला मिळत आहे. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा होत असल्याने सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारही मुंबईमधील गणपतींचे दर्शन घेत आहेत. ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मात्र गायिका लिझा शर्माने घातलेल्या कपड्यांमुळे दर्शन घेताना तिची चांगलीच नाचक्की होताना दिसत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

वास्तविक लोकप्रिय गायिका लिझा मिश्रा नुकतीच अंधेरीच्या राजाच्या  दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी लिझाने घातलेल्या कपड्यांवर मंडळाने आक्षेप घेतला. त्यामुळेच तिला दर्शनासाठी अडवण्यात आले. यावेळी मंडळाने लिझाला शाल गुंडाळायला दिली आणि त्यानंतरच तिला प्रवेश देण्यात आला. सध्या या बातमीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत असून हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. लिझाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान लिझा मिश्राही लोकप्रिय हिंदी गायिका तसेच संगीतकार आहे. तिने विरे दी वेडिंग, गुड न्यूज, जुग जुग जियो, लायगर अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर लिझाचा मोठा चाहता वर्ग आहे.

हेही वाचा  – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत झळकणार रणदीप हुड्डा, फस्ट लूक पाहून चाहते हैराण
प्रियांका चोप्रासोबत काम करून अर्जुन बाजवाला मिळाली ओळख, तरीही करिअर झाले फ्लॉप
फिरोज खानच्या गाडीला टक्कर मारून ‘विलन’ बनले शक्ती कपूर; काय आहे अभिनेत्याचं खरं नाव?

हे देखील वाचा