Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड ‘कायदेशीर कारवाई करायचीये, पण…’, म्हणत गाणं रिमेक केल्याने नेहा कक्करवर भडकली फाल्गुनी पाठक

‘कायदेशीर कारवाई करायचीये, पण…’, म्हणत गाणं रिमेक केल्याने नेहा कक्करवर भडकली फाल्गुनी पाठक

नेहा कक्कर हिने तिच्या गायनाने संपूर्ण इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या नवनवीन गाण्यांमुळे ती कायमच चर्चेत असते. रिमिक्स गाण्यांमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवणाऱ्या नेहाने नुकतेच 90च्या दशकातील प्रसिद्ध गाणे ‘मैंने पायल है छनकाई’चे रिमिक्स व्हर्जन रिलीज केले आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर नेहाला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. नेटिझन्स तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. कोणी तिच्या गाण्यावर बंदी घालण्याबद्दल बोलत आहे, तर कोणी तिला तुरुंगात पाठवण्याबद्दल बोलत आहेत. सोशल मीडियावर वाढणाऱ्या या मागण्यांदरम्यान आता मूळ गायिका फाल्गुनी पाठक यांचीही गाण्यावरची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

फाल्गुनी पाठक (Falguni pathak) या लोकप्रिय गायिकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. त्यांना प्रेमाने ‘दांडिया क्वीन’ म्हणून संबोधले जाते. आता पुन्हा एकदा त्यांनी नवरात्रीच्या सीजनमध्ये त्यांच्या नवीन गाण्याने थक्क केले आहे. फाल्गुनी त्यांच्या नवीन गाण्याबद्दल उत्सुक असतानाच, त्यांचे एक जुने गाणे ‘मैंने पायल है छनकाई’ नेहा कक्कर (Neha Kakkar) हिने रिक्रिएट केले आहे. या रिमिक्समध्ये प्रियांक शर्मा, धनश्री वर्मा आणि ती स्वतः दिसत आहे. नेहाच्या या रिमिक्सवर ज्येष्ठ गायिकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘मैंने पायल है छनकाई’ (Maine Payal Hai Chhankai) या गाण्याच्या मूळ गायिका फाल्गुनी पाठक यांनी गाण्याच्या रिमिक्सवर इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी युजर्सच्या स्टोरीचे स्क्रीनशॉट घेऊन स्वतःच्या स्टोरीवर शेअर करत नेहावर निशाणा साधला आहे.

शेअर केलेल्या स्टोरीमध्ये एका युजरने लिहिले की, “आधीपासून जे काही आहे, त्यावर पैसा घालवण्याऐवजी तिने आपल्या बुद्धीचा आणि कलेचा वापर मूळ कंटेंट तयार करण्यासाठी करायला हवा.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “आमच्या बालपणीच्या आठवणी अशाच उद्ध्वस्त होत आहेत.” फाल्गुनीने शेअर केलेल्या अखेरच्या स्टोरीमध्ये लिहिलंय की, “हे पाप बंद करा. कृपया कोणीतरी या ऑटोट्यून गायिकेवर आणि तिच्या रिमिक्सवर बंदी घाला.”

नेहाने हे गाणे रिक्रिएट केल्याने फाल्गुनी पाठकचा चाहतावर्ग खूपच निराश झाला आहे. लोक या गाण्यातील नेहाच्या आवाजावर खूप टीका करत आहेत आणि 90च्या दशकातील हे हिट क्लासिक गाणे खराब केल्याबद्दल तिला जोरदार ट्रोल देखील करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर युजर्सही फाल्गुनी पाठकच्या समर्थनार्थ उतरले आहेत. सोशल मीडियावर आय स्टँड विथ यू फाल्गुनी बेन असा ट्रेंड सुरू आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, फाल्गुनीकडे गाण्याचे कायदेशीर अधिकार नसल्याने ती नेहावर गुन्हा दाखल करण्यास असमर्थ आहे, परंतु ती तिच्याबद्दल खूप निराश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बिहारच्या लोकांकडून सोनूचे जंगी स्वागत, अभिनेत्यानेही घेतला प्रसिद्ध पदार्थाचा आस्वाद; व्हिडिओ व्हायरल
चाहत्यांना बेधुंद करणारा अमलाचा हॉट लूक, फोटो पाहून काळजात वाजेल घंटी
तेजस्वीला घर खरेदी करून देण्यात करण कुंद्राचा मोठा हात? आगपाखड करत अभिनेता म्हणाला, ‘ती माझ्या…’

हे देखील वाचा