Video: प्रेग्नेंसीबद्दल नेहा कक्करने केला मोठा खुलासा, व्हिडिओ शेअर करत म्हणाली…


नेहा कक्करने बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका म्हणून इंडस्ट्रीमध्ये आपणे खास स्थान निर्माण केले आहे. नेहा व्यावसायिक व्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. तिने २०२० मध्ये रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले आणि तेव्हापासून गायिकेच्या प्रेग्नेंसीच्या अफवा अनेक वेळा पसरल्या आहे. यापूर्वीही असेच काहीसे घडले होते. काही काळापूर्वी नेहा कक्करचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यात दावा केला होता की, नेहा कक्कर प्रेग्नेंट आहे. या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये नेहाचे पोट थोडेसे पुढे दिसत होते. पण आता नेहाने एक व्हिडिओ शेअर करून तिच्या प्रेग्नेंसीबद्दल खुलासा केला आहे.

नेहा कक्करने तिच्या यूट्यूब चॅनलवर ‘लाइफ ऑफ कक्कर’ नावाची नवीन सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या पहिल्या भागाचा विषय आहे, ‘नेहा कक्कर प्रेग्नंट आहे का?’ यादरम्यान नेहा तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित प्रत्येक अफवांना पूर्णविराम देताना दिसली. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, या सर्व अफवा काही चाहत्यांनी तिचे वाढलेले वजन पाहिल्यावर पसरवल्या. या व्हिडिओमध्ये नेहाने असेही सांगितले की, ती चांगला आहार घेत आहे आणि त्यामुळे तिचे वजन थोडे वाढले आहे. पण तिला वजन कमी करायचे आहे आणि ती या दिशेने कामही करणार आहे. (singer neha kakkar revealed the truth of pregnancy for the first time)

या व्हिडिओमध्ये नेहा कक्कर आणि रोहनप्रीतने हेही स्पष्ट केले आहे की, ते त्यांच्या बाळाला जन्म देण्यास तयार नाहीत आणि त्यांना आणखी २-३ वर्षे कुटुंब वाढवायचे नाही. याशिवाय, व्हिडिओमध्ये नेहा आणि रोहनप्रीत त्या लेखाबद्दलही बोलले आहेत, ज्यात त्यांच्या लग्नामागील खरे कारण सांगितले गेले होते.

रोहनप्रीत आणि नेहा कक्कर २० ऑक्टोबर २०२० रोजी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत होती. दोघांची भेट ‘नेहू दा व्याह’ या गाण्याच्या सेटवर झाली होती. दोघेही काही वेळातच एकमेकांना डेट करू लागले आणि नंतर त्यांनी लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता


Latest Post

error: Content is protected !!