Thursday, September 10, 2026
Home अन्य ‘इंडियन आयडल’मध्ये जबरदस्ती करावी लागते स्पर्धकांची प्रशंसा? दिग्गज गायकाने खोलली पोल

‘इंडियन आयडल’मध्ये जबरदस्ती करावी लागते स्पर्धकांची प्रशंसा? दिग्गज गायकाने खोलली पोल

सध्या टीव्हीवरील सर्वात चर्चेत असलेला शो म्हणजे ‘इंडियन आयडल १२’ होय. कारण मागील काही दिवसांपासून हा शो चांगलाच वादात अडकला आहे. या शोवर असा आरोप आहे की, दिग्गज पाहुण्यांना बोलवून स्पर्धकांची प्रशंसा करण्यास सांगितले जाते. अनेक रियॅलिटी शोचे परीक्षण केलेला गायक आणि कंपोजर सलीम मर्चंटनेही आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे सलीमदेखील या शोचा परीक्षक राहिला आहे. (Singer Salim Mechant Reacts On TV Show Indian Idol 12 Controversy Amit Kumar)

सलीमने खोलली इंडियन आयडलची पोल
एका मुलाखतीदरम्यान सलीमला विचारले की, त्यालाही शोचे परीक्षण करताना स्पर्धकांची प्रशंसा करण्यास सांगितले होते का? या प्रश्नाचे उत्तर देताना सलीमने मान्य केले होते की, त्यालाही असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याने कधीच असे केले नाही. आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सलीम म्हणाला की, “होय माझ्यासोबतही असे झाले आहे. मात्र, प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर मी कधीच त्यांनी सांगितलेले ऐकले नाही. कदाचित आज याच कारणामुळे मी कोणत्याही परीक्षकाच्या जागेवर बसत नाही.”

“मी त्यांची प्रशंसा यासाठी करत नाही, कारण मला स्पर्धकांची प्रशंसा करायला सांगितले आहे. मी त्यांची प्रशंसा यासाठी करतो की, कोणाच्याही चुका शोधण्याऐवजी त्यांच्यातील प्रतिभा पाहतो. जर मी त्याच्या प्रतिभेची प्रशंसा करू, तर कदाचित मला असे वाटते की, तो गायक चांगली कामगिरी करू शकतो. हेच असते. तुम्हाला आपल्या कमेंट्सवर उदार व्हावे लागते. माझ्यासोबत असे खूप वेळा झाले आहे की, शोचे दिग्दर्शक सांगतात की, कृपया तुम्ही नकारात्मक बनू नका. मात्र, याबाबतीत मी थोडा स्मार्ट आहे. मी नेहमीच चांगल्याप्रकारे चुका शोधतो.”

केव्हापासून सुरू झाला वाद?
खरं तर हा सर्व वाद दिग्गज गायक किशोर कुमार यांना श्रद्धांजली देणाऱ्या एपिसोडनंतर सुरू झाला. या एपिसोडसाठी किशोर कुमार यांचे सुपूत्र अमित कुमार यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. या एपिसोडनंतर अमित कुमार यांनी धक्कादायक खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, निर्मात्यांनी स्पर्धकांची प्रशंसा करण्यासाठी सांगितले होते.

यानंतर हा वाद विकोपाला गेला आणि यावर अनेक दिग्गज गायकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यात सोनू निगम, कुमार सानू यांसारख्या अनेक गायकांचा समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी अन् स्वप्नीलने शेअर केले अत्यंत रोमँटिक फोटो; पाहायला मिळाली ‘समांतर २’ मधील बोल्ड केमिस्ट्रीची झलक

-बापरे बाप! ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने केली मानधनात वाढ? एका आठवड्यासाठी घेणार ‘इतके’ कोटी

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’

हे देखील वाचा