टॅक्स भरण्यावरुन अभिनेत्री असलेल्या माय-लेकींमध्ये झाले होते वाद, पुढे कधीही पाहिले नाही…


पैसा हा प्रत्येक माणसासाठी महत्वाचा असतो. आयुष्यात पैसा कमावण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. पण कधी कधी हा पैसा कमावण्याच्या भ्रमात अनेकजण जवळच्या माणसांना गमावतात. असेच काहीसे बॉलिवूड मधील कलाकारांसोबत देखील घडले. पैसा आणि नात्यांच्या पारड्यात अनेकवेळा पैश्याचे पारडे जड ठरते. आज आपण जाणून घेणार आहोत बॉलिवूडमधील अशा एका माय-लेकीची कहाणी ज्या केवळ पैश्यामुळे एकमेकींपासून लांब झाल्या होत्या.

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने 60 च्या दशकात अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नूतन. तिच्या पहिल्या चित्रपटात तिला तिची आई शोभना यांनी लॉन्च केले होते. त्यांनी त्यांचे प्रोडक्शन हाऊस शोभना पिक्चरच्या बॅनरखाली तिला लॉन्च केले होते. त्यांनतर नूतन तिच्या आईसोबत एक पार्टनर बनून त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होती. कंपनीतील सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये ती तिच्या आईच्या बरोबरीने काम करत होती.

एके दिवशी इन्कम टॅक्स ऑफिसमधून त्यांच्या कंपनीला टॅक्स भरण्यासाठी पत्र आले. तेव्हा नूतनच्या आईने आलेला संपूर्ण टॅक्स नूतनला भरायला सांगितला. नूतन ही कंपनीची केवळ 30 % प्रॉपर्टीची भागीदार होती. त्यावेळी टॅक्स देखील खूप आला होता. तेव्हा नूतन तिच्या आईला म्हणाली होती की,”कंपनीमध्ये माझे जेवढे शेअर आहेत, तेवढा टॅक्स भरायला मी तयार आहे. तसेही माझी संपूर्ण कमाई कंपनीमध्येच जमा होते. पण तू मला संपूर्ण टॅक्स भरायला सांगत आहे. हे खूप चुकीचे आहे.”

नूतनने तिच्या आईला खूप समजावले तरीही तिची आई काही ऐकायला तयार नव्हती. तेव्हा ती म्हणाली की,”ठीक आहे तू तयार नाहियेस. पण बघ तुला पटत असेल तर आपण आपली काही प्रॉपर्टी विकून टॅक्स भरू शकतो.” पण तरी देखील तिच्या आईने या गोष्टीला नकार दिला. त्यावेळी नूतनच्या लक्षात आले की, या क्षणी तिच्या आईसाठी नात्यापेक्षा पैसा आणि प्रॉपर्टी जास्त महत्वाची आहे. त्यावेळी तिने तिच्या आईला सांगितले की,”आज पासून माझे आर्थिक व्यवहार मी स्वतः बघेल. आज पासून तुझे आणि माझे मार्ग वेगळे असतील.”

या घटनेनंतर नूतनच्या आईने तिचे घर सोडले. एवढच नाही तर तिने नूतनच्या एका जागेत बंगला देखील बांधायला सुरुवात केली होती. जेव्हा गोष्टी तिच्या हाता बाहेर गेल्या तेव्हा मात्र नूतनने कायद्याची मदत घेतली आणि तिच्या आईच्या विरोधात केस केली. या सगळ्यानंतरही तिला टॅक्स द्यायचा होता. तेव्हा तिने तिच्या पतीच्या मदतीने टॅक्सची संपूर्ण रक्कम भरली होती. पण त्यानंतर नूतन आणि तिच्या आईचे नाते पुन्हा कधीच चांगले झाले नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.