Friday, April 26, 2024

‘दाक्षिणात्य सिनेमांमुळे खराब हिंदी चित्रपट करावे लागत नाहीत’, सोनु सूदच्या वक्तव्याने नव्या वादाला सुरूवात

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सोनु सूद (Sonu Sood) त्याच्या आगामी ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात सोनु सूदने कवि चांद बरदाईची भूमिका साकारली आहे. या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटासोबतच सोनु सूद त्याच्या एका वक्तव्यामुळेही चांगलाच चर्चेत आला आहे. इतकेच नव्हेतर या वक्तव्यामुळे पून्हा एकदा टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये वादही रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. काय आहे हे प्रकरण आणि कोणते आहे सोनु सूदचे वक्तव्य चला जाणून घेऊ. 

गेल्या अनेक महिन्यांपासून दाक्षिणात्य सिनेजगत आणि बॉलिवूडमध्ये चांगलेच युद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. साऊथच्या चित्रपटांना मिळणारे यश आणि लोकप्रियता यावरुन या वादाला सुरूवात झाली होती. अनेक बड्या कलाकारांनी बॉलिवूडवर तोंडसुख घेताना दाक्षिणात्य सिने जगताचे कौतुक केले होते. तेव्हापासूनच या वादाला सुरूवात झाली होती. या सगळ्या वादावर आता अभिनेता सोनु सूदनेही प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता सोनु सूदने १९९९ मध्ये कल्लाझगर नेंदिनील या तामिळ चित्रपटांतून आपल्या अभिनय कारकिर्दिचा श्रीगणेशा केला होता. सोनु सूदने बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य सिने जगतातही अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून साऊथच्या प्रेक्षकांचा आवडता अभिनेता अशी त्याची ओळख आहे. अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना सोनुने दाक्षिणात्य सिने जगताचे तोंडभरुन कौतुक केले आहे.  यावेळी सोनु सूदने सांगितले की, “मी माझ्यासाठी निवडकच स्क्रिप्ट घेत असतो. मी तामिळ चित्रपट करु, किंवा हिंदी चित्रपट करु, पण साउथचे चित्रपट मला खराब कथा घेण्यापासून नेहमीच वाचवतात असे वक्तव्य सोनू सूदने केले आहे. त्याचबरोबर अनेकदा तुम्ही फक्त कथा पाहून मोठा चित्रपट निवडता, मात्र दाक्षिणात्य चित्रपट मला असे न करण्यास मदत करतात” असेही म्हणले आहे. दरम्यान आता प्रेक्षकांनो सोनु सूदच्या या आगामी चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा