Friday, June 26, 2026
Home अन्य धक्कादायक घटना.! चालू कार्यक्रमात पुरुष चाहत्याच्या तोंडावर गायिकेने केली लघूशंका

धक्कादायक घटना.! चालू कार्यक्रमात पुरुष चाहत्याच्या तोंडावर गायिकेने केली लघूशंका

मागील आठवड्यात एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायिका सोफिया उरिस्ताने एका चाहत्याला स्टेजवर झोपवून त्याच्या चेहऱ्यावर लघूशंका केल्याची धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

यानंतर केलेल्या या विचित्र कृत्याची तिने माफी मागितली आहे. तिने सोशल मीडियावर हे जाहीर केले आहे की, तिचा हेतू कोणालाही दुःख पोहचवण्याचा नाहीये. सोफिया उरिस्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गायिका म्हणतेय की, “मी स्टेजवर असताना नेहमीच माझ्या मर्यादेत असते. परंतु त्या रात्री मी माझी मर्यादा विसरून गेले होते. मी माझे कुटुंब, माझा बॅंड यापेक्षाही जास्त माझ्या चाहत्यांवर प्रेम करते. मला माहित आहे की, लघवी करण्याचा माझा स्टंट खूप चुकीचा होता. मी त्यासाठी सगळ्यांची माफी मागते.” (Sophia urista has apologize for going too far by peeping on a fan on stage)

या घटनेनंतर गायिकेच्या बॅंड ब्रास अगेंस्टने देखील माफी मागितली आहे. बँडने त्याच्या ट्विटरवर लिहिले की, “सोफिया उरिस्ता त्यावेळी खूप उत्साही झाली होती. ज्याची आम्ही कोणीच अपेक्षा देखील केली नव्हती. परंतु प्रेक्षकांना आमच्या शोमध्ये परत असे पाहायला मिळणार नाही.”

११ नोव्हेंबर रोजी झालेल्या या लाईव्ह कॉन्सर्टचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात ती पँट काढून चाहत्याच्या तोंडावर लघूशंका करताना दिसते. ही घटना पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता

हे देखील वाचा