Saturday, April 20, 2024

दुःखद! दाक्षिणात्य अभिनेते श्रीकांत यांचे निधन, रजनीकांत यांनी व्यक्त केला शोक

 

तामिळ चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते श्रीकांत यांचे मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. या घटनेने संपूर्ण तामिळ चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९६५ मध्ये त्यांनी ‘वेन्निरा अदइ’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

श्रीकांत हे लोकप्रिय तामिळ अभिनेते होते. आपल्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी फक्त नायकाच्या नव्हे तर खलनायकाच्या, चरित्र आदी अनेक भूमिका साकारल्या होत्या. दिवंगत नेत्या आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या अभिनेत्री जयललिता यांच्यासोबतही त्यांनी चित्रपटात काम केले होते. तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन श्रीकांत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले, ‘श्रीकांत सारखा जिवलग मित्र गमावल्याचे मला खुप दुःख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो’ असा भावुक संदेश त्यांनी लिहिला आहे.

 

दरम्यान, श्रीकांत यांचा जन्म १९ मार्च १९४० रोजी झाला. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी ते नोकरी करत होते. त्यांनी १९६५ मध्ये चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. श्रीकांत यांनी जवळपास २०० पेक्षा जास्त तामिळ चित्रपटात काम केले असून, त्यापैकी सुमारे ५० चित्रपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली. सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन, सिवकुमार यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका देखील साकारली आहे. त्यांनी तामिळ टीव्ही मालिकेमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. १९७० ते १९८० च्या दरम्यान त्यांनी अनेक नाटकांमध्ये सुद्धा काम केले.

श्रीकांत यांनी ‘वेन्निरा अदइ, ‘नानल’, ‘सेल्वा मगल’, ‘आलायम’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे. ते शेवटचे २००९ मध्ये ‘कुडीयारसु’ या चित्रपटात दिसून आले होते. श्रीकांत यांना एकुलती एक मुलगी असून ती अमेरिकेत असते. श्रीकांत यांच्या निधनानंतर संपूर्ण तामिळ चित्रपट सृष्टीतील कलाकारांसोबतच इतरही अनेक मोठमोठ्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा