Friday, April 26, 2024

नाद करायचा नाय.!! टॉलिवूडमधील ‘या’ तारका घेत असलेली फी ऐकूण तोंडात बोटे घालाल; वाचा महागड्या अभिनेत्रींबद्दल

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी बॉलीवूडपासून ते हॉलीवुडपर्यंत नाव कमावले आहे. आता यात दाक्षिणात्य अभिनेत्री देखील मागे राहिलेल्या नाहीत.

दक्षिण भारतातील अनेक अभिनेत्रींनी देखील बॉलीवूडपासून हॉलीवुडपर्यंत त्यांचे नाव कमावले आहे. त्या देखील बॉलिवूडमधील अभिनेत्रींप्रमाणेच मोठ्या प्रमाणात कमाई करतात. त्यातील अनेक अभिनेत्री घेत असलेले मानधन पाहून तुमचे डोळे विस्फारतील.

चला तर जाणून घेऊयात टॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्रींबद्दल ज्या सर्वात जास्त मानधन घेतात.

  • काजल अग्रवाल

काजल अग्रवालने ‘सिंघम’ आणि ‘स्पेशल 26’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील अभिनेत्रींमध्ये काजल अग्रवालचा समावेश अनेक महागड्या अभिनेत्रींमध्ये येतो. तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी ती एक ते सव्वा कोटी एवढी रक्कम घेते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त रक्कम घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी काजल अग्रवाल ही एक आहे.

https://www.instagram.com/p/CMzTktRnuxb/?utm_source=ig_web_copy_link

  • नयनतारा

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नयनतारा ही बॉलिवूडमधील अभिनेत्रींपेक्षाही जास्त फी घेते. ती दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक टॉपची अदाकारा आहे. नयनतारा एका चित्रपटासाठी अडीच ते तीन कोटी रुपये फी घेते.

  • अनुष्का शेट्टी

बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी हीने आज बॉलिवूडमध्ये देखील सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये अनुष्का एक नावाजलेली अभिनेत्री आहे. वृत्तपत्रांच्या माहितीनुसार अनुष्का एका चित्रपटासाठी चार ते पाच कोटी रुपये फी घेते.

  • तमन्ना भाटिया

अनुष्का शेट्टी प्रमाणेच बाहुबली या चित्रपटातून सर्वत्र प्रसिद्ध होणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया ही देखील एक महागडी अभिनेत्री आहे.

प्राप्त माहितीनुसार तमन्ना भाटीया ही एका हिंदी चित्रपटासाठी 90 लाख ते 1 कोटी रुपये फी घेते.

हे देखील वाचा