Friday, July 12, 2024

चाहत्यांची पवन कल्याणला वाढदिवसाची ग्रेटभेट! मोडणार थेट महेश बाबूचा विक्रम

दाक्षिणात्य सुपरस्टार पवन सिंग आज ( २ सप्टेंबर) ला आपला वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांमुळे तो सिने जगतात विशेष प्रसिद्ध आहे. पवन कल्याण अभिनयासोबतच राजकारणातही सक्रिय असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतानाच पवननेही आपल्या चाहत्यांना वाढदिवसानिमित्त सुंदर भेट दिली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

पवन कल्याणच्या ‘जलसा’ या चित्रपटाची लोकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, त्याचे 500 हून अधिक शो होण्याची शक्यता आहे. पवन कल्याण स्टारर या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये झालेली वाढ पाहता, या खास दिवशी आणखी एक गोष्ट खास आहे. वास्तविक, चाहत्यांनी अभिनेत्याचा 52 फुटांचा कट आऊट बनवला आहे. चेन्नईतील रोहिणी थिएटरच्या बाहेर हा कट आऊट लावण्यात आला आहे. एखाद्या अभिनेत्यासाठी लोकांच्या मनात इतकं प्रेम पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तेलुगू सुपरस्टार महेश बाबूच्या चाहत्यांनीही या वर्षी ऑगस्टमध्ये त्याच्या वाढदिवसाला असेच काहीसे केले होते.

अभिनेत्याचा वाढदिवस आणखी खास बनवणाऱ्या पवन कल्याणच्या या मोठ्या कटआउटचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ‘जलसा’ हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट ठरला. या चित्रपटात पवन कल्याणसोबत इलियाना डिक्रूज मुख्य भूमिकेत दिसली होती. ‘जलसा’ चित्रपटाची कथा संजय नावाच्या मुलावर आधारित आहे.

हेही वाचा – कोणी चित्रकार तर कोणी बुद्धिबळपटू, बॉलिवूड कलाकार खेळांमध्येही आहेत आघाडीवर
मुकेश अंबानींच्या गणपती विसर्जनाला पोहचले रणवीर- दीपिका, डान्स पाहून सारेच हैराण
लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाले ‘हे’ कलाकार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा