सुपरस्टार रजनीकांत चेकअपसाठी विशेष विमानाने जाणार अमेरिकेला; केंद्र सरकारकडून दाखवण्यात आला हिरवा झेंडा


दाक्षिणात्य इंडस्ट्रीचे सुपरस्टार, ज्यांना लोकं देव म्हणून पूजतात असे अभिनेते म्हणजे रजनीकांत. रजनीकांत म्हटले की डोळ्यासमोर येते दमदार स्टाइल, भारी संवाद आणि ऍक्शन. रजनीकांत यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केले. मात्र त्यांना साऊथ सिनेसृष्टीमधे देवाची उपाधी मिळाली. लोकं आजही त्यांना देवासारखे पूजतात. अचानक रजनीकांत चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे रजनीकांत कोरोनाकाळात विशेष परवानगी घेऊन परदेशात जात आहे.

रजनीकांत यांना त्यांच्या मेडिकल चेकअपसाठी अमेरिकेला जायचे होते. त्यासाठी रजनीकांत यांनी केंद्र सरकारकडून खास परवानगी काढली आहे. केंद्र सरकाने रजनीकांत यांची ही मागणी मान्य केल्याचे प्राप्त माहितीनुसार समजले आहे. त्यानुसार लवकरच रजनीकांत एका खास विमानाने अमेरिकेला रवाना होणार आहेत. रजनीकांत ज्या विमानाने अमेरिकेला जाणार आहेत त्या विमानाची क्षमता १४ लोकांची असून, रजनीकांत त्यांच्यासोबत परिवारातील काही सदस्यांना देखील सोबत नेणार आहे. (south superstar rajinikanth gets permission to travel to the us for a medical check up)

रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष मागच्या काही काळापासून बायको आणि मुलांसोबत अमेरिकेतच आहे. तिथे तो त्याच्या आगामी हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला असून, रजनीकांत अमेरिकेला गेल्यानंतर धनुष आणि त्याची बायको देखील रजनीकांत यांच्यासोबत असणार आहे.

रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. त्यांची मुलगी सौंदर्याने रजनीकांत यांचा लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. घरात सोफ्यावर बसून लस घेताना पाहून रजनीकांतचा हा फोटो चर्चेत आला होता. मात्र रजनीकांत यांचे प्रवक्ता रियाझ अहमद यांनी या सर्व गोष्टींचे खंडन करत रजनीकांत यांनी एका खाजगी रुग्णालयात लस घेतल्याचे सांगितले.

तत्पूर्वी याचवर्षी रजनीकांत यांना मानाच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रजनीकांत लवकरच त्यांच्या आगामी ‘अन्नात्थे’ चित्रपटात दिसणार असून, याची शूटिंग पूर्ण झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लॉकडाऊननंतर ‘बिग बी’ प्रथमच निघाले शूटिंगवर; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

-‘तू ऐलराधा, तू पैल संध्या!’ पाहा निसर्गाच्या सानिध्यात हरवलेल्या मृण्मयी देशपांडेची नैसर्गिक सुंदरता

-‘आयुष्यात विस्कटलेल्या गोष्टी गुंडाळता येत नसतील, तर…’, सुंदर फोटोवर ‘स्वीटू’ने लिहिलं लक्षवेधी कॅप्शन


Leave A Reply

Your email address will not be published.