Saturday, June 29, 2024

‘Gadar 2’च्या स्क्रीनिंगला सावत्र बहिणीसोबत दिसले सनी आणि बॉबी; चाहता म्हणाला, ‘ही बाँडिंग फक्त प्रमोशनसाठी’

तब्बल 22 वर्षांनंतर रिलीज सनी देओल पुन्हा एकदा ‘तारा सिंग‘ या भूमिकेत नव्याने पाहायला मिळत आहे. सनीच्या ‘गदर 2‘ सिनेमाला रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. अशात सनीच्या सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढतच आहे. 11 ऑगस्ट रोजी या सिनेमाचा ग्रँड प्रीमिअर झाला होता. यावेळी संपूर्ण देओल कुटुंबाने हजेरी लावली होती. मात्र, हेमा मालिनी यांच्याकडून कोणीही नव्हते. आता ईशा देओल हिने आपल्या सावत्र आणि मोठ्या भावाच्या सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवल, जिथे सनी देओल याच्यासोबत बॉबी देओल यानेही हजेरी लावली. तसेच, त्यांनी आपल्या सावत्र बहिणीसोबत पोझही दिले. यादरम्यानचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

सावत्र भाऊ बहीण एकत्र
ईशा आणि अहाना देओल 11 ऑगस्ट रोजी झालेल्या रेड कार्पेट ग्रँड प्रीमिअरमध्ये पोहोचली नव्हती. त्यामुळे हेमा मालिनी यांच्या मोठ्या मुलीने आपल्या घरीच या सिनेमाची स्क्रीनिंग ठेवली. येथे सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांच्याव्यतिरिक्त जायद खान आपल्या पत्नीसोबत आणि अभिनेत्री मधु शाह यांनीही हजेरी लावली. तसेच, सनी आणि बॉबीने ईशा आणि अहानासह त्यांच्यामुलासोबतही फोटो काढले.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. एका युजरने लिहिले की, “सिनेमा जेव्हा रिलीज झाला, तेव्हा यांना आपल्या बहिणींची आठवण आली. मात्र, जेव्हा मुलाचे लग्न होत होते, तेव्हा यांना विसरले होते. सगळ्या कुटुंबाची बाँडिंग ही सिनेमाच्या प्रमोशनसाठी असते.” आणखी एकाने लिहिले की, “सनी, बॉबी आणि ईशाला एकत्र पाहून मला आज खूपच चांगले वाटले. मला माहितीये की, अनेक लोकांचा भ्रम मोडला असेल की, हेमाजींच्या मुलींसोबत खराब नाते आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी दोन लग्न केले आहेत. पहिले लग्न त्यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत केले होते. त्यांच्याकडून धर्मेंद्र यांना चार अपत्य झाले होते. त्यात दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. तसेच, 1980मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याशी संसार थाटला होता. हेमाकडून धर्मेंद्र यांना दोन मुली, ईशा देओल (Esha Deol) आणि अहाना देओल झाल्या. अशात त्यांच्या कुटुंबाला एकत्र पाहणे, ही चाहत्यांसाठी खूपच आनंदाची गोष्ट असते. कदाचित 12 ऑगस्टची रात्र हा तोच दिवस होता, जेव्हा एकाच फ्रेममध्ये सावत्र बहिणींसोबत सनी आणि बॉबी दिसले.

‘गदर 2’ सिनेमाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईविषयी बोलायचं झालं, तर रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने दुसऱ्या दिवशी 43 कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे सिनेमा पहिल्या दिवशीच्या 40 कोटींसह दोनच दिवसात 80 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला. हा आकडा लवकरच 100 कोटींमध्ये बदलेल, अशी चर्चा रंगली आहे. (special screening of gadar 2 sunny deol bobby deol pose with step sisters esha deol video viral)

महत्त्वाच्या बातम्या-
‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच जिया शंकर बनली आलिशान कारची मालकीण, स्वत:च्या हिंमतीवर खरेदी केली महागडी कार
ही दोस्ती तुटायची नाय! जुन्या मित्रासाठी नाना पाटेकरांची ‘Gadar 2’च्या स्क्रीनिंगला हजेरी, पाहा मित्रप्रेम

हे देखील वाचा