Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बापाच्या पैशांवर जगणाऱ्या मुलींमधली नाही सारा; वर्षाकाठी छापते ‘एवढे’ कोटी, एका सिनेमासाठी घेते ३ कोटी

सिनेसृष्टीत असे काही कलाकार आहेत, ज्यांचे आई-वडील हिंदी सिनेजगतातील नावाजलेले कलाकार आहेत. अशात कोणत्याही स्टारकिडला वाटेल की, आपण आपल्या आई-वडिलांच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊ आणि बॉलिवूडमध्ये नाव कमवू. मात्र, स्टारकिड असे असतात, ज्यांना कुटुंबीयांची मदत न घेता स्वत:च्या पायावर उभे राहायचे असते, आणि ते राहतातही. अशीच स्टारकिड म्हणजे अभिनेत्री सारा अली खान होय. सारा ही प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. तिने तिच्या आई-वडिलांच्या प्रसिद्धीचा फायदा न घेता स्वत:च्या हिमतीवर नाव कमावले. सारा शुक्रवारी (दि. 12 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर तिच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया…

साराची एकूण संपत्ती
सारा अली खान हिने खूप कमी काळात एक मोठे स्थान मिळवले आहे. स्टारकिड म्हणून जन्मलेल्या साराने तिच्या बिंधास्त आणि सुपरहॉट अवताराने सर्वांची मने जिंकली आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, सारा ही 22 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. सारा वर्षाकाठी जवळपास 6 कोटी रुपयांची कमाई करते. तिच्या एका सिनेमाची फी ही तब्बल 3 कोटी रुपये इतकी आहे. दुसरीकडे, सारा ही जाहिरातींमधूनही बक्कळ पैसे कमावते. ती अनेक ब्रँड्सची ब्रँड एंबेसेडर आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सारा एका ब्रँड प्रमोशनसाठी जवळपास 50  ते 60 लाख रुपये घेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

अनेकांसोबत जोडलं गेलंय साराचे नाव
सारा ही तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. साराने सुशांतसोबत बॉलिवूड पदार्पण केले होते आणि असे म्हटले जाते की, ते दोघेही रिलेशनशिपमध्येही होते. मात्र, यावर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर ‘लव्ह आज कल’ या सिनेमादरम्यान तिची आणि कार्तिक आर्यनची जवळीकता वाढल्याच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, यादेखील चर्चाच बनून राहिल्या. सुशांत आणि कार्तिकनंतर साराचे नाव ईशान खट्टर, हर्षवर्धन कपूर आणि वीर पहाडिया यांच्यासोबतही जोडले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

इंस्टा क्वीन आहे सारा
सारा अली खान ही तिच्या सिनेमांसोबतच सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. साराची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिच्या इंस्टाग्रामचा आधार घेतात. त्यावर तिचे एकापेक्षा एक फोटो पाहायला मिळतात. कधी साडीतील फोटो, तर कधी बिकिनीतील फोटोंनी चाहत्यांच्या बत्त्या गुल करण्याचे काम सारा करते. तिचा प्रत्येक फोटो व्हायरल होण्यास खूप वेळ लागत नाही. याव्यतिरिक्त सारा तिचे अनेक व्हिडिओही शेअर करते. साराला इंस्टाग्रामवर 4  कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात. तिने आतापर्यंत 800 हून अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराची अभिनय कारकीर्द
स्वप्नांची मायानगरी मुंबईत 12 ऑगस्ट, 1995 रोजी सारा अली खान (Sara Ali Khan) हिचा जन्म झाला होता. साराने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्यासोबत ‘केदारनाथ’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती ‘सिम्बा’ या सिनेमात रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्यासोबत झळकली होती. साराचा तिसरा सिनेमा हा ‘लव्ह आज कल’ हा होता, ज्यामध्ये ती प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्यासोबत दिसली होती. याव्यतिरिक्त सारा शेवटची ‘अतरंगी रे’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) यांच्या मुख्य भूमिका होत्या. सारा लवकरच विकी कौशल (Vicky Kaushal) आणि विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) वेगवेगळ्या सिनेमात दिसणार आहे.

अधिक वाचा- 
‘मुलीला कसं पटवायचं?’, चाहत्याच्या प्रश्नावर शाहरूखने दिले लक्षवेधी प्रत्युत्तर, म्हणाला, ‘पहिल्यांदा तू…’
‘मुलीला कसं पटवायचं?’, चाहत्याच्या प्रश्नावर शाहरूखने दिले लक्षवेधी प्रत्युत्तर, म्हणाला, ‘पहिल्यांदा तू…’

हे देखील वाचा