Thursday, November 21, 2024
Home साऊथ सिनेमा आली लहर केला कहर! ‘आरआरआर’ने जगातल्या सर्वोत्तम 50 सिनेमांच्या यादीत टॉम क्रूझलाही टाकलं मागं

आली लहर केला कहर! ‘आरआरआर’ने जगातल्या सर्वोत्तम 50 सिनेमांच्या यादीत टॉम क्रूझलाही टाकलं मागं

ब्लॉकबस्टर सिनेमे देण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणजे एसएस राजामौली होय. राजामौली यांनी ‘बाहुबली‘ सीरिजनंतर ‘आरआरआर‘ हा सिनेमा इंडस्ट्रीला दिला. जवळपास 550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा मार्च 2022मध्ये रिलीज झालेला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1200 कोटींची कमाई केली होती. यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या या सिनेमाने देशातील पुरस्कारांसोबत आंतरराष्ट्रीय पुरस्कारही नावावर केले आहेत. अशात या सिनेमाची गणना यावर्षीच्या सर्वोत्तम सिनेमांमध्येही केली जात आहे.

राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (JR NTR) अभिनित ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा आता या वर्षीच्या जगातील सर्वोत्तम सिनेमांच्या यादीत नाव नोंदवले आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाने टॉम क्रूझ (Tom Cruise) याच्या ‘टॉप गन: मॅव्हरिक‘ (Top Gun: Maverick) या सिनेमालाही पछाडलं आहे.

टॉप 10मध्ये ‘आरआरआर’
ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युटच्या साईट आणि साऊंड मॅगझिनने ‘आरआरआर’ या सिनेमाला 2022मधील 50 सर्वोत्तम सिनेमांमध्ये सामील केले आहे. एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या या ऐतिहासिक सिनेमाने या यादीत 9वे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, टॉम क्रूझच्या ‘टॉप गन: मॅव्हरिक’ सिनेमाला या यादीत 38वे स्थान मिळाले आहे. या यादीत शौनक सेन याची डॉक्यूमेंट्री ‘ऑल दॅट ब्रीड्स’चाही समावेश आहे. या डॉक्यूमेंट्रीला यादीत 32वे स्थान मिळाले आहे.

‘आफ्टर सन’चा पहिला क्रमांक
ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटची साईट आणि साऊंड मॅगझिन दरवर्षी जगातील सर्वोत्तम 50 सिनेमांची यादी जाहीर करते. या यादीत चार्लोट वेल्स यांच्या दिग्दर्शनातील पहिला सिनेमा ‘आफ्टर सन’ला पहिले स्थान मिळाले आहे. हा सिनेमा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे.

‘आरआरआर’ची कहाणी
‘आरआरआर’ हा सिनेमा यावर्षाच्या सुरुवातीला रिलीज झाला होता. हा सिनेमा तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमा 1920च्या दशकातील दोन भारतीय क्रांतीकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कौमाराम भीम यांच्यावर आधारित आहे. या सिनेमात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरव्यतिरिक्त आलिया भट्ट (Alia Bhatt) हिनेदेखील भूमिका साकारली आहे. तसेच, अजय देवगण (Ajay Devgn) हादेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. (ss rajamouli film rrr ranks 9th in global list of top 50 films of 2022 beats tom cruise)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फक्त सिनेमाच ब्लॉकबस्टर, 400 कोटींच्या ‘कांतारा’च्या कलाकारांना दिले फक्त ‘एवढे’ मानधन; आकडा करेल हैराण
‘गोविंदाला त्याचा हक्क मिळाला नाही, आज तो सर्वात मोठा सुपरस्टार असता’, रोहित शेट्टीचे भाष्य

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा