Friday, March 29, 2024

‘तू झूठी मैं मक्कार’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कॉमेडीयन अनुभव सिंगबद्दल जाणून घ्या ‘या’ गोष्टी

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा काही दिवसांपूर्वीच ट्रेलर प्रदर्शित झाला. सिनेमाचं ट्रेलर पाहून अनेकांनी हा सिनेमा पाहायचा हे ठरवले आहे. कारण सिनेमाचा ट्रेलर आलेच एकदम धमाकेदार. मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाची दर्शकांना प्रतीक्षा होती. पहिल्यांदाच पडद्यावर श्रद्धा आणि रणबीर ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरने तर उत्सुकता वाढवली आहे, मात्र सोबतच अनेकांना रणबीरसोबत ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या एका भूमिकेने चांगलीच भुरळ घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anubhav Singh Bassi (@be_a_bassi)

‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमात रणबीर कपूरच्या मित्राची भूमिका साकारत आहे, कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये त्याची भूमिका पाहून सर्वांनाच त्याच्या विषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. ट्रेलरमध्ये दिसून येत की त्याने रणबीर कपूरच्या मित्राची भूमिका साकारली आहे. अनुभव ‘तू झूठी मैं मक्कार’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अनुभ सिंग हा एक उत्तम स्टॅन्ड अप कॉमेडियन असून तो अतिशय चांगल्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. अनुभव त्यांच्या युनिक कॉमेडीसाठी ओळखला जातो. त्याचे जोक्स ऐकण्यासाठी लोकं खूप दुरून दुरून येतात. इंस्टाग्रामवर देखील अनुभव चांगलाच प्रसिद्ध असून त्याचे १७ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

अनुभवचा जन्म ९ जानेवारी १९९१ साली मेरठमध्ये झाला. त्याने लॉ या विषयात पदवी संपादन केली असून, बराच त्याने युपीएससीच्या परीक्षेची तयारी केली आहे. मात्र त्याचे नशीब विनोदात फळफळले आणि २०१७ साली त्याने या कॉमेडीच्या जगात प्रवेश केला. त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्याचे स्वतःचे एक यूट्यूब चँनेल देखील आहे. जिथे त्याचे ३ मिलियन पेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. बॉलिवूडच्या आधी अनुभवने ओटीटी माध्यमात प्रवेश केला. त्याने अनेक कॉमेडी सिरीज केल्या आणि शो केले. नेटफ्लिक्सच्या एक शोचे सूत्रसंचालन देखील त्याने केले आहे. यात त्याने कपिल शर्माची मुलाखत घेतली होती. एका रेपोर्टवर बस्सीकडे एक घर, गाडी असून त्याची संपत्ती १६ कोटींच्या आसपास आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
क्रिकेटनंतर आता मनोरंजनाच्याही मैदानावर उतरतोय धोनी, चित्रपटाचे मोशन पोस्टर आऊट
कुठे हाेतेय मारामारी तर कुठे तिकिटासाठी 10 हजार देण्याची तयारी, पाहा ‘पठाण’ ने कसा घातलाय धुमाकूळ

हे देखील वाचा