Saturday, June 29, 2024

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी याच्यावर संतप्त जमावाची दगडफेक

बॉलिवूड विश्वातील ( Bollywood ) प्रसिद्ध अभिनेता इमरान हाशमी ( Actor Emraan Hashmi ) याच्यावर दगडफेक ( Stone Pelting ) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमरान हाश्मी हा जम्मू-काश्मीर ( Jammu and Kashmir ) येथे त्याच्या आगामी चित्रपटाचे शुटींग संपवून पहलगाम ( Pahalgam ) येथील एका मार्केटमध्ये त्याच्या टीमसोबत आला होता. त्यावेळी अज्ञातांनी इमरान हाशमी आणि त्याच्या टीमवर दगडफेक केली. ( Unknown Persons Threw Stones On Actor Emraan Hashmi )

सोमवारी (19 सप्टेंबर) रोजी जेव्हा अभिनेता इमरान हाशमी त्याच्या चित्रपटाचे शुटींग संपल्यावर टीमसोबत पहलगाम येथील बाजारात फिरण्यासाठी आला होता, तेव्हा त्याच्यावर काही अज्ञातांनी दगडफेक केली. पोलिसांनी याप्रकरणी कलम 148, 370, 336, 323 गुन्हा दाखल केला आहे. तसेच, एका आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला अटकही केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

मागील 14-15 दिवसांपासून इमरान हाशमी येथे त्याच्या आगामी ‘ग्राऊंड झिरो’ ( Ground zero ) चित्रपटाचे ( Movie ) शुटींग ( Shooting ) करत होता. मात्र असे सांगितले जात आहे की, येथील एका कॉलेजात शुटींग संपल्यानंतर त्याची वाट पाहत असलेल्या चाहत्यांशी अभिनेत्याने संवाद साधला नाही. त्यामुळे तेव्हा चाहते प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी तेव्हा मीडिया प्रतिनिधींकडे व्यक्त केली होती.

इमरान हाशमी काश्मीरमध्ये चित्रपट ग्राऊंड झिरो चित्रपटाचे शुटींग करत होता, ज्याचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर ( Tejas Vijay Deoskar ) यांनी केले आहे. या चित्रपटात इमरान हाशमीसोबत सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) आणि जोया हुसैन ( Zoya Hussain ) या अभिनेत्री दिसणार आहेत. तर आगामी काळात इमरान हाशमी अभिनेता अक्षय कुमार याच्या सेल्फी आणि सलमान खान याच्या टायगर – 3 चित्रपटात देखील दिसणार आहे. ( Stone Pelting On Emraan Hashmi In Kashmir Pahalgam Police Arrested Miscreant )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
‘माझ्या अंगठीने कितीतरी लोक खरेदी करता येतील’, काजोलच्या वक्तव्याने पेटून उठले नेटकरी; म्हणाले…
दु:खद! एकेकाळच्या दिग्गज अभिनेत्रीकडे नाहीयेत उपचारासाठी पैसे, हॉस्पिटलमध्ये आहे ऍडमिट

हे देखील वाचा