Saturday, July 6, 2024

जय बच्चन यांच्याकडे १५ कोटींची प्रॉपर्टी, ४० कोटीचे दागिने अन्…बच्चन परिवारात कोणाकडे अधिक संपत्ती?

ज्येष्ठ अभिनेत्री, राजकारणी जया बच्चन पाचव्यांदा राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. चित्रपटामध्ये आपल्या दमदार अभिनयानंतर राजकारणात पोहचलेल्या जया बच्चन (jaya Bachchan) या सध्या चर्चेत आल्या आहेत. मंगळवारी समाजवादी पक्षाने त्यांना उत्तर प्रदेशमधून वरिष्ठ सभागृहासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. त्यानंतर जय बच्चन यांनी निवडणुक प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार त्या कोट्यवधीच्या मालकीण आहेत.

जया बच्चन यांनी दिलेल्या निवडणुक प्रतिज्ञपत्रात त्यांच्या एकूण संपत्तीचा उल्लेख केला आहे. ७५ वर्षीय जया बच्चन यांना पक्षाने सलग पाचव्यांदा राज्यसभेत सपा खासदार म्हणून पुन्हा उमेदवारी दिली आहे. 13 फेब्रुवारीला जया बच्चन यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिले. यामध्ये त्यांनी चल- अचल संपत्तीचा उल्लेख केला आहे.

एकूण संपत्ती किती?
दिलेल्या माहितीनुसार, प्रतिज्ञापत्रामध्ये २०२२-२३ या आर्थित वर्षातील दोघांची कमाई नमूद करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये जया बच्चन यांची कमाई १,६३,५६,१९० रुपये होती. तर अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती २७३,७४,९६,५९० रुपयांची भर पडली आहे. जया बच्चन यांच्याकडे ५७ हजार ५०७ रुपये रोख आणि १० कोटी ११ लाख ३३ हजार १७२ रुपये बँक खात्यात जमा आहेत.

तर त्यांचे पती अमिताभ बच्चन यांच्याकडे १२ लाख ७५ हजार ४४६ रुपये रोख आणि १ अब्ज २० कोटी ४५ ​​लाख ६२ हजार ८३ रुपयांच्या बँक ठेवी आहेत. जया बच्चन यांच्याकडे ४०.९७ कोटी रुपयांचे दागिने आहेत. तर अमिताभ यांच्याकडे ५४.७७ कोटी रुपयांचे दागिने आहेत.

अमिताभ यांच्या कारचे कलेक्शन जवळपास १७ कोटी रुपये आहे. यात मर्सिडीज बेंझ, लँड क्रूझर आणि लेक्सस सारख्या कारचा समावेश आहे. अमिताभ यांच्याकडे प्रतीक्षा आणि जलसासह चार बंगले आहेत. . बच्चन दाम्पत्याने एनएसएस, पोस्टल सेव्हिंग किंवा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एकही पैसा गुंतवला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मोठ्या मनाचे अनुपम खेर ! तो व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर उमटेल हसु
स्कायडायविंग करत 13,000 हजार फूटावरुन ‘योद्धा’ चे पोस्टर लॉन्च; सिनेसृष्टीत पहिल्यांदाच…

हे देखील वाचा