मिस युनिव्हर्स २०२१ चा ताज भारताच्या हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हिच्या डोक्यावर सजला आहे. हा ताज २१ वर्षांपूर्वी २००० मध्ये लारा दत्ताने जिंकला होता. आता २१ वर्षीय हरनाजने हा मुकुट भारतात परत आणला आहे. ७० व्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेच्या मंचावर ‘इंडिया’ला विजेता घोषित करण्यात आले, तेव्हा हरनाजला अश्रू अनावर झाले. संपूर्ण भारतासाठी हा भावनिक क्षण होता. अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तेथील परिक्षकांपैकी एक होती. तिलाही यावेळी आपले अश्रू आवरता आले नाहीत. उर्वशीने तिचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
उर्वशी रौतेलाला अश्रू अनावर
मिस युनिव्हर्स २०२१ च्या विजेत्याची घोषणा नेहमीप्रमाणेच हृदयद्रावक होती. आपल्या देशाचे नाव ऐकून हरनाज संधू जोरजोरात रडू लागली. उर्वशीनेही या भावनिक क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने लिहिले आहे की, “मिस युनिव्हर्स परीक्षक म्हणून आम्ही सर्वोत्तम निर्णय घेतला. मला रडू आवरले नाही. भारत, आम्ही ते करून दाखवले.” (urvashi rautela cries as winner harnaaz sandhus name announced)
उर्वशी देखील राहिलीय ब्युटी क्वीन
अभिनेत्री उर्वशी या सौंदर्य स्पर्धेत परीक्षक म्हणून उपस्थित होती. उर्वशीने तिच्या परिचयाचा व्हिडिओही शेअर केला आहे. उर्वशी मिस दिवा युनिव्हर्स २०१५ राहिली आहे आणि २०१५ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना पराभूत करून जिंकला ताज
पंजाबच्या हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना पराभूत करून हे विजेतेपद पटकावले आहे. १९९४ मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा ताज भारतात आणला. त्यानंतर २००० साली लारा दत्ताने हा किताब पटकावला. विशेष म्हणजे ज्या वर्षी लाराला ताज मिळाला, त्याच वर्षी हरनाजचा जन्म झाला. जिंकल्यानंतर हरनाजने देवाचे आणि तिच्या पालकांचे आभार मानले.
हेही वाचा :